मशिदीवरील भाेंगे चार दिवसात न काढल्यास खळखटयाक; भाेंग्याच्या वादावरुन मनसेत पुण्यात दुफळी


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिशिदीवरील भाेंगे सुरु राहिल्यास त्यासमाेर जाेरदार आवाजात हनुमान चालिसा लावण्याचे वक्तव्य केले. मात्र, यावरुन पुण्यात मनसे मध्ये दुफळी निर्माण झाल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिशिदीवरील भाेंगे सुरु राहिल्यास त्यासमाेर जाेरदार आवाजात हनुमान चालिसा लावण्याचे वक्तव्य केले. मात्र, यावरुन पुण्यात मनसे मध्ये दुफळी निर्माण झाल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे. पुणे शहर मनसेच्या एका सेल प्रमुखांनी डेक्कन पाेलीस ठाण्यात लेखी पत्र देऊन, डेक्कन परिसरातील सर्व मशीदीवरील अनाधिकृत भाेंगे चार दिवसात न काढल्यास खळखटयाक करण्याचा इशारा दिला आहे.  Pune Maharashtra Navanirman Sena splitting on masjid speaker issue

मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत संभूस व पुणे शहर अध्यक्ष (रस्ते-साधन,सुविधा, आस्थापन विभाग)अश्विन चाेरगे यांनी पाेलीसांना दिलेल्या पत्रात सांगितले आहे की, सर्वाच्च न्यायालयाने घालुन दिलेल्या नियमानुसार सर्व मशिदीवरील भाेंगे अनाधिकृत ठरवले गेले आहे. आमच्या पक्षाची काेणाच्याही धार्मिक भावना दुखावयाची इच्छा नाही अथवा प्रार्थनेला विराेध नाही. परंतु अनाधिकृत भाेंग्यामुळे सर्वसामान्य नागरिक,वृध्द व विद्यार्थी यांना हाेणारा त्रास मनसे खपवून घेणार नाही. अनाधिकृत भाेंगे बंद करण्याची जबाबदारी पाेलीस व सरकारवर आहे. येत्या चार दिवसात सर्व मशीदी समाेर दुप्पट पटीने स्पिकर लावून हनुमान चालिसाचे पठन केले जाईल., त्यामुळे निर्माण हाेणाऱ्या सामाजिक तेढास सर्वस्वी सरकार जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला आहे.



पुणे मनसे शहराध्यक्ष नगरसेवक वसंत माेरे यांनी राज ठाकरे यांच्या भाेंग्या बाबतच्या भूमिकेला विराेध करत मुस्लीमबहुल भागाचे प्रतिनिधीत्व आम्ही करत असल्याने प्रभागात शांतता कशी राहिल याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. मी माझ्या प्रभागात तरी मशिदींसमाेर भाेंगले लावणार नाही. मी पक्षाच्या भूमिकेवर नाराज नाही, मी ज्या भागाचे १५ वर्ष प्रतिनिधीत्व करताे त्याठिकाणी मुस्लिम मतदार माेठया प्रमाणात आहे. शहरातील दाेन पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले हाेते त्यांच्याशी चर्चा करुन त्यांची समजूत काढण्यात आल्याचे ही त्यांनी सांगितले आहे.

राज ठाकरेंच्या नावाला काळे फासले

पुण्यातील काेंढवा येथील नुरानी कब्रस्थानचे भूमिपूजन राज ठाकरे यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वी झाले हाेते. परंतु राज ठाकरे यांनी अजानच्या भाेंग्यावरुन आक्रमक भूमिका घेतल्याने अल्पसंख्याक समाजातील त्यांचे चाहते नाराज झाले आहे. पुण्यातील काेंढवा येथील राज ठाकरे यांचे नाव असलेला फलकावर स्थानिकांनी काळा रंग लावून त्यांचा निषेध नाेंदवला आहे.

Pune Maharashtra Navanirman Sena splitting on masjid speaker issue

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात