घाटातील राफेलची पुणे जिल्ह्यात रंगली चर्चा


एका राफेलच्या किंमतीची चर्चा पुणे जिल्ह्यात रंगली आहे. हा राफेल म्हणजे काही लढाऊ विमान नाही पण या लढाऊ विमानाप्रमाणेच वा-याच्या वेगाने धावत बैलगाडा शर्यतींचा घाट रंगवणारा बैल आहे. खेड तालुक्यातील वाडा येथील एका मैसुर जातीच्या ‘राफेल’ बैलाला तब्बल १९ लाख ४१ हजार रुपये ऐवढी किंमत मोजत एका बैलगाडा शौकिंनाने खरेदी केली आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे – देशात राफेल या लढाऊ विमानांच्या खरेदीवरुन मोठ्या प्रमाणात राजकीय वादळ उठले होते. या किमंती अव्वाच्या सव्वा लावत विमाने विकत घेतल्याचा आरोप विरोधकांनी सत्ताधा-यांवर लावला होता. आता अशाच एका राफेलच्या किंमतीची चर्चा पुणे जिल्ह्यातही रंगली आहे. हा राफेल म्हणजे काही लढाऊ विमान नाही पण या लढाऊ विमानाप्रमाणेच वा-याच्या वेगाने धावत बैलगाडा शर्यतींचा घाट रंगवणारा बैल आहे. खेड तालुक्यातील वाडा येथील एका मैसुर जातीच्या ‘राफेल’ बैलाला तब्बल १९ लाख ४१ हजार रुपये ऐवढी किंमत मोजत एका बैलगाडा शौकिंनाने खरेदी केली आहे.Raceing competition One bull salleing highest price of १९ lakh rupees in pune district

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शर्यंतीचे आयोजन होत आहे. या शर्यतीत विविध ब बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवल्यानंतर शर्यत प्रेमींच्या आनंदाला उधाण आले आहे. ग्रामीण अर्थकारणाचा महत्त्वाचा भाग असलेल्या या बैलगाडा शर्यतीमुळे सर्वत्र पुन्हा एकदा या उत्साहाचे वातावरण आहे. चांगल्या दर्जाचे बैल आता या परिसरातील बाजारात येऊ लागले आहे. वाडा (ता. खेड) येथील शेतकरी अक्षय मुळूक, सिद्धार्थ हुंडारे याच्या राफेल बैलाने लांडेवाडी येथील शर्यतील पहिलांदा धावला. या शर्यतीत पहिला आणि येथीलच थापलिंग घाटाचा राजा हा किताब राफेलने मिळवला.



राफेल हा मैसूर बेरड जातीचा तगडा बैल आहे. ४ महिन्यांचा असताना निलेश घनवट यांच्या कडून आॅक्टोबर २०२० मध्ये अक्षय मुळूक, सिद्धार्थ हुंडार यांनी हा बैल घेतला होता. तेव्हा त्याची किंमत ४४ हजार होती. हा रांगडा राफेल अनेकांच्या पसंतिस उतरला होता. राफेल बैलाचे देखणे रूप व दौड बैलगाडा शौकीन त्याच्यावर खुश होते. राफेलची यापूर्वी प्रथम १० लाखाला मुळूक यांचेकडे मागणी केली होती. परंतु, मुळूक यांनी या व्यवहाराला नकार दिला.

त्यानंतर पै. संकेतशेठ आहेर बैलगाडा संघटना (चिखली) व कै. सहादू मामा काळोखे बैलगाडा संघटना (देहूगाव) यांनी तब्बल १९.४१ लाखाला रुपए देऊन बैलाची खरेदी केली आहे. बैलाला घाटात जुपण्यासाठी विक्रम शेठ तनपुरे, प्रतिक कदम आणि सागर तनपुरे यांचे मोलाचे सहकार्य होते. बैलगाडा विश्वात राफेलने मात्र पंचक्रोशीचे नाव गगनाला भिडवले असल्याने राफेलला घेऊन जाताना अनेक जण भाऊक होत आपल्या अश्रूंना मोकळी वाट करुन दिली.

Raceing competition One bull salleing highest price of १९ lakh rupees in pune district

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात