पुरुषोत्तम खेडेकरांचा खरा प्रस्ताव की केंद्रातल्या सत्तेच्या वळचणीला येऊन बसण्याचा पवारांचा डाव…??


नाशिक : आत्तापर्यंत संघ आणि भाजप यांना सातत्याने टीकेच्या धारेवर धरणाऱ्या पुरुषोत्तम खेडेकर यांनी “राजकारणासाठी राजकारण” करायचे असल्यास भाजपशी युतीचा पर्याय संभाजी ब्रिगेडने स्वीकारावा, असे जे म्हटले आहे तो त्यांचा खरा प्रस्ताव आहे की शरद पवारांचा केंद्रातल्या सत्तेच्या वळचणीला येऊन बसण्याचा डाव आहे…??!!, याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.Purushottam Khedekar’s real proposal or Pawar’s instinct to come and sit at the center of power

पुरुषोत्तम खेडेकर यांनी आत्तापर्यंत सातत्याने संघ आणि भाजपच्या विरोधात भूमिका घेतली आहे. संभाजी ब्रिगेड ही राष्ट्रवादीचेच पिल्लू आहे ही सार्थ टीका काही त्यांच्यावर झाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्यासारख्या व्यक्तीने एकदम “यु टर्न” घेऊन भाजपशी युती करण्याचा प्रस्ताव मांडावा याला राजकीय दृष्ट्या वेगळा वास येतो आहे.शरद पवारांचे केंद्राच्या पायाखाली सहकाराचे घोंगडे अडकले आहे. अमित शहा केंद्रात सहकार मंत्री आहेत. त्यांच्याकडे सहकारी बँकांचा विषय घेऊन पवार जाऊन आले आहेत. पण त्याचा फारसा उपयोग झालेला दिसलेला नाही. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला थेट भाजपबरोबर जोडण्याऐवजी संभाजी ब्रिगेडच्या “दिंडी दरवाजातून” भाजपशी जोडता येते का??, हे पाहण्याचा पवारांचा डाव असू शकतो.

या निमित्ताने आपले केंद्राच्या पायाखालचे सहकाराचे घोंगडे काढता आले तर बघावे, असाही पवारांचा होरा असू शकतो, अशी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळेच त्यांनी पुरुषोत्तम खेडेकर यांच्यासारख्या बरेच दिवस बाजूला पडलेल्या व्यक्तीच्या करवी असा प्रस्ताव दिला असू शकतो, असे बोलले जात आहे.

या खेरीज पुरुषोत्तम खेडेकर यांना स्वतःलाच आपण बाजूला पडल्याची टोचणी लागल्यामुळे त्यांनी राजकारणात एक पिल्लू सोडून द्यावे” असा हा प्रस्ताव दिला असावा, असेही मानण्यात येत आहे.संभाजी ब्रिगेडची माध्यमांनी उभी केलेली ताकद कितीही मोठी असली तरी प्रत्यक्षात त्यांची राजकीय ताकद मोठी नाही. राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांची राजकीय ताकद घेऊन गिळुन टाकली आहे.

शिवाय राष्ट्रवादीची ताकद देखील फार मर्यादेच्या पलीकडे वाढत नाही हे 22 वर्षाच्या राजकारणातून लक्षात आले आहे. अशा स्थितीत पुरुषोत्तम खेडेकर यांना भाजपचा पर्याय पुढे दिसत असल्यास नवल नाही. आपण स्वतः बाजूला पडण्यापेक्षा मुख्य प्रवाहात सामील झालेले बरे असा मराठा समाजाचा जुनाच राजकीय विचार यातून त्यांनी पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे.

महाराष्ट्रात शेतकरी कामगार पक्षाच्या पाठीशी एकेकाळी मराठा समाज उभा होता. परंतु यशवंतराव चव्हाण यांच्या कथित बेरजेच्या राजकारणातून शेतकरी कामगार पक्ष मोडला आणि मराठा समाजाने काँग्रेसचा राजकीय आश्रय घेतला. त्याची पुनरावृत्ती पुरुषोत्तम खेडेकर भाजपच्या आश्रयाला जाऊन करीत आहेत काय…?? असा प्रश्न विचारणे योग्य ठरेल.

अर्थात यशवंतराव चव्हाण आणि पुरुषोत्तम खेडेकर यांच्यात मूलभूत आणि मोठे भेद आहेत. यशवंतराव चव्हाण यांची राजकीय ताकद आणि सामाजिक स्थान आणि पुरुषोत्तम खेडेकर यांचे यांची राजकीय ताकद आणि सामाजिक स्थान ह्याच्यात प्रचंड मोठी तफावत आहे. परंतु त्यांच्या सारख्या बाजूला पडलेल्या व्यक्तीकरवी पवारांसारखे नेते भाजपशी वेगळ्या मार्गाने सलगी करू शकतात हेच या निमित्ताने दिसून येत आहे.

यातली तिसरी महत्त्वाची बाब उत्तर प्रदेशासारख्या राज्यात मायावती, अखिलेश यादव ब्राह्मण समाजाचे लांगुलचालन करण्याच्या मागे लागले आहेत. महाराष्ट्रात ब्राह्मण समाजाची राजकीय आणि सामाजिक ताकद तोळामासा असल्याने त्याची पुरुषोत्तम खेडेकर यांच्यासारख्या नेत्याला गरज नाही. पण भाजपची राजकीय आणि सामाजिक ताकद आता शेटजी भटजींच्या पक्षापलिकडे गेली आहे हे मान्य करावे लागते. त्यातूनच कदाचित त्यांनी भाजपशी युती करण्याचा प्रस्ताव संभाजी ब्रिगेडला दिला असावा, असेही बोलले जात आहे.

केंद्रातून भाजपची सत्ता हलत नाही. राज्यात भाजपची ताकद संघर्ष करून वाढलेली आहेच. त्या ताकदीचा आपल्यासाठी उपयोग करून घेणे किंवा भाजपशी आघाडी करून भाजपची ताकद पोखरणे. त्यावर आपला पक्ष पोसणे असाही त्यांचा राजकीय होरा असू शकतो. हा प्रयोग पवारांनी काँग्रेसच्या बाबतीत केला आहे. काँग्रेसची ताकद पोखरून पवारांनी स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पोसले आहे.

या सर्वांची गोळाबेरीज पाहता मराठा समाजाला सत्तेच्या जवळ नेणे, आसपास ठेवणे, सत्तेच्या आसपास राहून आधी तयार केलेल्या संस्थांची आर्थिक ताकद टिकवण्याचा प्रयत्न करणे हाच त्यांचा मनसूबा असल्याचे स्पष्ट होत आहे.

Purushottam Khedekar’s real proposal or Pawar’s instinct to come and sit at the center of power

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण