Manoj Patil Inside Story : अभिनेता साहिल खान MR India winner मनोज पाटीलला का द्यायचा मानसिक त्रास?…वाचा मनोज अन् साहिलच्या दुश्मनीची कहानी


मनोजच्या कुटुंबियांनी साहिल खानविरोधात ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून पोलिस पुढचा तपास करीत आहेत.


विशेष प्रतिनिधी

मुंबई: अभिनेता साहिल खान याच्या त्रासाला कंटाळून मिस्टर इंड़िया राहिलेल्या मनोज पाटीलने अखेर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.. २९ वर्षीय मनोज पाटीलने विषारी गोळ्या खाऊन आपलं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. सध्या मनोज मुंबईतील कूपर हॉस्पिटलमध्ये अँडमिट असून आता त्याची प्रकृती स्थिर आहे. मनोजच्या कुटुंबियांनी साहिल खानविरोधात ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून पोलिस पुढचा तपास करीत आहेत.Manoj Patil attempted Suicide: Why did actor Sahil Khan give MR India winner Manoj Patil mental torture?

बुधवारी रात्री मनोज पाटीलने आत्महत्या करत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. मनोज पाटीलने अभिनेता साहिल खान आपल्याला गेल्या अनेक दिवसांपासून त्रास देत असल्याचा आरोप केला आहे. त्याने त्याच्या सोशल मीडियावरही व्हिडीओ शेअर करत हे आरोप केले होते. त्रास आणि बदनामीमुळेच आपण आत्महत्येचं पाऊल उचलत असल्याचं मनोज पाटीलने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. ज्यात त्याने साहिल खानचा उल्लेखही केला आहे.

https://www.instagram.com/p/CT2nrzUlhg1/?utm_source=ig_web_button_share_sheet

मिस्टर इंडिया राहिलेला मनोज पाटील मिस्टर ऑलिम्पियासाठी प्रयत्न करत होता. साहिल खानलाही या स्पर्धेत उतरायचं होतं. यामुळेच साहिल खान आपण स्पर्धेत सहभागी होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचा मनोज पाटीलचा आरोप आहे. याशिवाय व्यावसायिक तसंच इतर वादही होते. याशिवाय साहिल खान गेल्या कित्येक दिवसांपासून त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून मनोज पाटील विरोधात व्हिडिओही पोस्ट करत होता. ज्यात मनोज त्याच्या न्युट्रिशन शॉपमधून कसे नकली स्टेरिओईडस विकतो ह्याचे त्याने व्हिडिओ पोस्ट केले होते.

ज्या व्हिडिओमध्ये काही फोनवर रेकॉर्ड करण्यात आलेली संभाषणं टाकण्यात आली होती. या विरोधात मनोज पाटीलनेही त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून साहिल खान आपल्याला कसा मानसिक त्रास देतोय हे सांगत होता. अभिनेता साहिल खान माझ्यावर जळतो, साहिल माझ्या न्युट्रिशन शॉपविषयी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अपप्रचार करतो, तसेच माझं करिअर संपवण्याची धमकी देतो असं मनोजने म्हटलं होतं. आणि हा मानसिक त्रास सहन न झाल्याने मनोजने अखेर आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं.

मनोज पाटीलचा प्रवास

मनोजचा जन्म 1992 मध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांने वयाच्या 13 व्या वर्षीच आपल्या कुटुंबासाठी कमाई करण्यास सुरुवात केली होती. आधी तो वर्तमानपत्र दारोदार जाऊन वितरित करायचा, दूध विकायचा आणि गाड्याही धुवायचा. तेव्हा महिन्याला अंदाजे 400 ते 500 रुपये तो कमवत होता.या काळात त्याने दररोज व्यायाम करणाऱ्‍या आपल्या भावाकडून प्रेरणा घेतली आणि वयाच्या 16 व्या वर्षी मनोजने जवळच्या जिममध्ये वर्कआऊट करण्यास सुरुवात केली.

 

वयाच्या 18 व्या वर्षत्याला शरीरसौष्ठव स्पर्धांबद्दल माहिती मिळाली आणि काही स्पर्धांमध्ये त्याने भाग घेण्यास सुरुवात केली. पण पदरी आलेल्या अपयशाने तो खचून गेला नाही, तर त्याने येत्या काही वर्षांत अधिक मेहनत घेण्यास सुरुवात केली.वयाच्या 20 व्या वर्षी मनोज पाटीलने 8-10 स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि काही किताब जिंकले, परंतु तरीही तो मुख्य विजेतेपदांपासून दूरच होता. 21 व्या वर्षी त्याने ज्युनियर मिस्टर मुंबई स्पर्धेत भाग घेतला आणि सुवर्णपदक जिंकले, ज्यामुळे त्याचे मनोबल उंचावले. पुढे त्याने मिस्टर महाराष्ट्रमध्ये सहभागी होत रौप्य पदक पटकावले.मनोजला मेन्स फिजिक स्पर्धेबद्दल माहिती मिळाली आणि त्याने त्याविषयी गुगल आणि यूट्यूबवर संशोधन सुरू केले.

 

त्याने तिथून तांत्रिक बाबी जाणून घेतल्या आणि 2015 मध्ये मिस्टर इंडिया मेन्स फिजिकमध्ये भाग घेतला, पण तो टॉप 15 मध्ये प्रवेश करू शकला नव्हता.तेव्हाच त्याने ठरवले, की पुढच्या वर्षी तो नक्कीच विजेतेपद पटकावेल. म्हणून त्याने कठोर परिश्रम करण्यास सुरवात केली आणि त्याच्या मेहनतीचे फळ त्याला पुढच्या वर्षी मिळाले. मनोजने 2016 मध्ये मिस्टर इंडिया मेन्स फिजिक स्पर्धेचे विजेतेपद जिंकले.

https://www.instagram.com/tv/CTtvLQzg_jQ/?utm_source=ig_web_button_share_sheet

साहिल खान

एक बॉलिवूड अभिनेता, फिटनेस उद्योजक आणि यूट्यूबर आहे. फिटनेस जागरूकता वाढवण्यासाठी तो ओळखला जातो आणि त्याने मुंबईतील अनेक संस्थांकडून पुरस्कार पटकावले आहेत.साहिलने त्याच्या एका म्युझिक व्हिडीओद्वारे त्याच्या बॉलिवूड कारकिर्दीला सुरुवात केली होती. या गाण्याचे नाव ‘नाचेंगे सारी सारी रात’ असे होते. त्याचे हे गाणे सुपरहिट ठरले आणि त्यानंतर साहिलने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. साहिलचा ‘स्टाईल’ या चित्रपटातील अभिनय आणि त्याचा लूक चांगलाच गाजला होता.

बॉलिवूडपासून दूर असलेला साहिल आता बॉडी बिल्डिंगपासून लाखो रुपये कमवत आहेत. त्याने मसल्स अँड बीच नामक जिम चेन सुरू केली आहे. ज्याच्या माध्यमातून तो बक्कळ कमाई करत आहे. बॉलिवूडपासून दूर असलेला साहिल आता बॉडी बिल्डिंगच्या माध्यमातून लक्झरी आयुष्य जगत आहेत. तो सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना फिटनेसचा सल्ला देखील देत राहतो. फिट बॉडीसाठी बरेच लोक साहिलला फॉलो करतात.आणि या सगळ्या स्पर्धेतूनच साहिल खान आणि मनोज पाटील हा वाद सुरू झाला.. आता पोलिस साहिल खानविरोधात काय कारवाई करतात हे काही दिवसांतच कळेल…

Manoj Patil attempted Suicide: Why did actor Sahil Khan give MR India winner Manoj Patil mental torture?

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात