कोरोनाविरोधी लसीचे दोन डोस घेतलेल्यानाच रेल्वे प्रवास करण्याची पुण्यातून परवानगी


वृत्तसंस्था

पुणे : कोरोनाविरोधी लसीचे दोन डोस घेतलेल्यानाच रेल्वे प्रवास करण्याची पुण्यातून परवानगी आहे. त्यामुळे कोरोनाचे निर्बंध अजूनही लागू असल्याचे स्पष्ट होत आहे. असे निर्बंध नसल्याचे सरकारने रेल्वेला कळविले नाही, त्यामुळे हा प्रकार सुरू आहे. pune locals are still have restrictions of corona railway station

पुणे-लोणावळादरम्यान धावणाऱ्या लोकल, डेमू तसेच जनरल तिकिटासाठी कोरोनाचे निर्बंध लागू आहेत. त्यामुळे केवळ दोन डोस घेतलेल्या प्रवाशांनाच प्रवास करण्याची परवानगी आहे. राज्य सरकारने याबाबत रेल्वेला कोणताच आदेश दिला नाही. त्यामुळे रेल्वेदेखील जुन्या नियमांची अंमलबजावणी करीत आहे. त्यामुळे प्रवासी व तिकीट केंद्रावरील कर्मचारी यांच्यात वाद होत आहेत.



पुणे-लोणावळा लोकल, पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या इंटरसिटी दर्जाच्या गाड्याना देण्यात येणारे अनारक्षित तिकीट केवळ दोन डोस घेतलेल्या प्रवाशांनाच दिले जात आहे. यात सिंहगड, डेक्कन क्वीन, डेक्कन, इंद्रायणी व पुणे-मुंबई इंटरसिटी या गाड्यांचा समावेश आहे. यतिकीट हवे असेल तर प्रवाशांना दोन डोस झालेले प्रमाणपत्र अजूनही दाखवावे लागत आहे. तेव्हाच त्यांना जनरल व लोकलचे तिकीट दिले जात आहे.

pune locals are still have restrictions of corona railway station

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात