रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम ; खाद्यतेल महागणार सूर्यफूल तेलाचा पुरवठा २५ टक्क्यांनी होऊ शकतो कमी


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या लढाईमुळे सनफ्लॉवर तेलाचा पुरवठा २०२२-२३ या आर्थिक वर्षात २५ टक्के किंवा ४० ते ६० लाख टनांनी कमी होऊ शकतो. यामुळे किंमती वाढू शकतात. मात्र, खाद्यतेलाचे दर आधीच बरेच चढे आहेत. देशाचा एकूण खाद्यतेलाचा वापर २३०-२४० लाख टन आहे. Russia-Ukraine war raises edible oil prices The supply of sunflower oil can be reduced by 25%

यामध्ये सूर्यफूल तेलाचा वाटा १० टक्के आहे. त्याची ६० % मागणी आयातीच्या माध्यमातून पूर्ण होते. भारत वर्षाकाठी २.५ दशलक्ष टन सूर्यफूल तेल आयात करतो. युक्रेनचे योगदान ७०% आणि रशियाचे २० % आहे.

युक्रेन आणि रशिया दरवर्षी १०० दशलक्ष टन कच्च्या सूर्यफूल तेलाची आयात करतात. युक्रेनच्या बंदरांमध्ये सुमारे ३० लाख टन सूर्यफूल तेल अडकले आहे. अलीकडच्या काळात रशियाकडून ४५ हजार टन सूर्यफूल तेलाची खरेदी २१५० डॉलर प्रतिटन या भावाने करण्यात आली आहे.फेब्रुवारीमध्ये किंमती ४ % वाढल्या फेब्रुवारीमध्ये सूर्यफूल तेल ४ % वाढले होते. मात्र, गेल्या वर्षभरात खाद्यतेलाच्या किमती १५ ते २० टक्क्यांनी वाढल्या आहेत. देशात मोहरीची आवक वाढली असली तरी भावात फारशी घसरण झाली नाही. देशात पाम, सोयाबीननंतर सूर्यफूल तेलाला मोठी मागणी आहे.

दुसरीकडे, किमती आटोक्यात ठेवण्यासाठी तेलाच्या साठवणुकीची मर्यादा ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.रशिया-युक्रेन युद्धामुळे, सरकारने आता खाद्यतेल आणि तेलबियांच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याची साठवण मर्यादा ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत वाढवली आहे. ही मर्यादा १ एप्रिलपासून लागू होणार आहे. पुरवठा संकटामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत. याचा परिणाम भारतीय बाजारावरही झाला आहे.

आयात शुल्क कमी करणे, तसेच वेब पोर्टल तयार करणे यासह किमती कमी ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्याचे सरकारचे म्हणणे आहे. यावर प्रत्येकाने आपल्या स्टॉकच्या स्थितीची माहिती द्यावी. खाद्यतेलाच्या बाबतीत केंद्र सरकारने किरकोळ विक्रेत्यांसाठी ३० क्विंटल, घाऊक विक्रेत्यांसाठी ५०० क्विंटलची मर्यादा निश्चित केली आहे.

ब्रिटानिया यावर्षी उत्पादनांच्या किंमती ७ % पर्यंत वाढवणार

ब्रिटानिया यावर्षी आपल्या उत्पादनांच्या किंमती ७ % पर्यंत वाढवणार आहे. कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने कंपनी दरवाढ करणार आहे. साहित्याच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. पुरवठ्यावरही परिणाम दिसून येतो. यामुळे येत्या काळात ग्राहकांना कंपनीची उत्पादने खरेदी करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

ब्रिटानियाचे व्यवस्थापकीय संचालक वरुण बेरी म्हणाले, “मी दोन वर्षांचा काळ कधीच पाहिला नाही, जो खूप वाईट होता. या वर्षी ३ % चलनवाढ होईल, असा आमचा आधी विश्वास होता, पण आता ती ८ ते ९ % पर्यंत जाऊ शकते.

आठ मूलभूत उद्योगांचे उत्पादन ५.८ % वाढले

कोळसा, नैसर्गिक वायूसह सहा क्षेत्रांची उत्तम कामगिरी यामुळे फेब्रुवारीत आठ मूलभूत उद्योगांच्या उत्पादनात ५.८ टक्के वाढ झाली. वाणिज्य मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, यावर्षी जानेवारीत मूलभूत उद्योगांच्या उत्पादनात ४ % वाढ झाली आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये ३.३ % घट नोंदवण्यात आली होती.

आकडेवारीनुसार, कच्चे तेल आणि खते वगळता इतर क्षेत्रातील उत्पादन फेब्रुवारीमध्ये वाढले. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या ११ महिन्यांत म्हणजेच एप्रिल-फेब्रुवारीमध्ये मूलभूत उद्योगांच्या उत्पादनात ११% वाढ झाली आहे.

Russia-Ukraine war raises edible oil prices The supply of sunflower oil can be reduced by 25%

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था