लाऊडस्पीकर काढा, नाहीतर मशिदींसमोर हनुमान चालीसा लावेन; राज ठाकरे यांचा सरकारला इशारा


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कर्नाटकात हिजाबचा मुद्दा लावून धरल्यानंतर आता देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याचे राजकारण सुरू झाले आहे. शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सांगितले की, आता मशिदींवरील माईक काढावे लागतील. यातून राज ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्याला पुन्हा धार दिली आहे.Take out the loudspeakers, otherwise Hanuman will bring Chalisa in front of the mosques; Raj Thackeray warns government

कोरोनामुळे दोन वर्षांनंतर शिवाजी पार्कवर मनसे कार्यकर्ता परिषदेला संबोधित करताना राज म्हणाले, मी धर्मांध नाही तर धर्माभिमानी आहे. प्रभू राम लल्लाच्या दर्शनासाठी मी लवकरच अयोध्येला जाणार आहे. मात्र, त्यांनी अयोध्या दौऱ्याची तारीख जाहीर केली नाही.



सभेला संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले की, मी नमाजच्या विरोधात नाही, पण सरकारने मशिदीतील लाऊडस्पीकर हटवण्याचा निर्णय घ्यावा. मी फक्त एक इशारा देत आहे. लाऊडस्पीकर काढा नाहीतर मशिदीसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा वाजवेन.

ते म्हणाले की, उत्तर प्रदेशची प्रगती होत असल्याचे पाहून मला आनंद होत आहे. महाराष्ट्रातही असाच विकास हवा आहे. अयोध्येला जाईन, पण आज कधी सांगणार नाही, हिंदुत्वावरही बोलेन. मला माझ्या धर्माचा अभिमान आहे.

Take out the loudspeakers, otherwise Hanuman will bring Chalisa in front of the mosques; Raj Thackeray warns government

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात