विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएच्या अध्यक्षपदाचा आपल्याला रस नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या कोल्हापूर दौर्यात केले आहे. शरद पवार यांनी यूपीएचे अध्यक्ष पद स्वीकारून देशाचे नेतृत्व करावे, असा ठराव राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दिल्लीतल्या मेळाव्यात केला होता. त्यावर मराठी माध्यमांनी “पॉवरफूल खेळी”, “शरद पवार यूपीएचे अध्यक्ष बनणार” अशा बातम्या चालवल्या होत्या. दोन-तीन दिवस या बातम्या चालवून घेतल्यानंतर शरद पवार यांनी आज कोल्हापूरच्या पत्रकार परिषदेत यूपीए अध्यक्षपदावर भाष्य केले. यूपीए अध्यक्ष पद आपल्याला अध्यक्षपदाचा आपल्याला रस नाही. तिसऱ्या आघाडीची जबाबदारी आपली नाही. मोठ्या पक्षांनी ती जबाबदारी घ्यावी. आपण त्याला शक्ती देऊ आणि सहकार्य करू, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. UPA Chairman: Sharad Pawar said in Kolhapur, I am not interested in UPA presidency … !!, but who will do it … ??
तिसऱ्या आघाडीचा संदर्भातील प्रयत्न करण्याची इच्छा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे आणि मला त्यांनी पत्र लिहून या संदर्भातली बैठक मुंबईत बोलण्याची विनंती केली आहे. परंतु असा कोणताही पुढाकार आपण घेणार नाही. मोठ्या पक्षांनी तो पुढाकार घेतला तर त्यांना सहकार्य जरूर करू, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. बिगर भाजप राजवटीत घेतल्या मुख्यमंत्र्यांशी यासाठी बोलावे लागेल. तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, केरळ या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची चर्चा करावी लागेल तसेच राजस्थान सारख्या राज्यातल्या काँग्रेस मुख्यमंत्र्यांशीही बोलावे लागेल, असे शरद पवार म्हणाले.
शरद पवार यांच्या यूपीए अध्यक्षपदाच्या मुद्द्यावर काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या प्रादेशिक नेत्यांनी त्यांना टोले लगावले नंतर आणि काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने नेहमीप्रमाणे थंडा प्रतिसाद दिल्यानंतर पवारांनी आपल्याला यूपीए अध्यक्षपद आत रस नसल्याचे स्पष्ट केले आहे.
पवारांच्या यूपीए अध्यक्षपदाचा प्रचार आणि प्रसार राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच शिवसेनेचे प्रवक्ते मावळते खासदार संजय राऊत हे देखील करत असतात. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेळाव्यात ठराव झाल्यानंतर त्या ठरावाची संजय राऊत यांनी देखील री ओढली होती. मात्र एकूणच या विषयाला काँग्रेसच्या हायकमांडने आणि इतर केंद्रीय नेतृत्वाने पूर्णपणे थंडा प्रतिसाद दिल्यानंतर आता कोल्हापुरातल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी आपल्याला यूपीए अध्यक्षपदात रस नसल्याचे सांगून या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App