श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात ऋषिपंचमीनिमित यंदा पाच महिलांच्या उपस्थितीतच अथर्वशीर्ष पठण


वृत्तसंस्था

पुणे: यंदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात अथर्वशीर्ष पठण पाच महिलांच्या उपस्थितीतच पार पडले. अनेक महिलांनी आणि हजारो भाविकांनी ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या या सोहळ्यात भाग घेतला.Pune Dagadusheth Ganpati Mandir Atharvashish pathan ; This Year only Five Ladies participated Due to COVID, others took part Online

दरवर्षी ऋषिपंचमीच्या दिवशी दरवर्षी हजारो महिलांच्या उपस्थितीत पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर अथर्वशीर्ष पठण सोहळा साजरा केला जातो. मात्र, यंदा करोनामुळे हा सोहळा केवळ पाच महिलांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. हजारो भाविकांनी ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या या सोहळ्यात सहभाग घेतला. गेल्या वर्षी सुद्धा अशीच परिस्थिती होती.



श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने ट्रस्टच्या १२९ व्या वर्षी, ऋषिपंचमीनिमित्त अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम आयोजित केला होता. यंदाही मुख्य मंदिरात प्रत्यक्षपणे पाच महिलांचीच उपस्थिती होती.

शुभांगी भालेराव यांसह अर्चना भालेराव, जयश्री शेळके, प्रेरणा देशपांडे, ज्योती देशमुख, स्नेहा परांजपे या पाच महिलांनी मुख्य मंदिरातून प्रत्यक्षपणे सहभाग घेतला. या पाच महिला सलग १२ वर्षे या उपक्रमात सहभाग घेत आहेत. यंदा उपक्रमाचं ३५ वे वर्ष आहे.

अथर्वशीर्ष पठणाचा प्रारंभ पहाटे ६ वाजता शंख वादनाने झाला. ओमकार, गणेश वंदना, दाही दिशांनी तम लोपवा प्रथमेशा जग जागवा… हे गीत सादर झाले. त्यानंतर गजर व आरती झाली. मंदिरात उपस्थित महिलांसह ऑनलाईन पध्दतीने उपस्थित भाविकांनी अथर्वशीर्ष पठण केले.

Pune Dagadusheth Ganpati Mandir Atharvashish pathan ; This Year only Five Ladies participated Due to COVID, others took part Online

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात