दरम्यान जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.Pune: A slap of a building collapsed in Kondhwa, injuring 3 workers
विशेष प्रतिनिधी
घोरपडी : कोंढवा येथील शिवनेरीनगर गल्ली नं ३ मधील सोनिया श्रीमाई क्लासिक इमारतीचा सहाव्या मजल्यावरील ४५० स्वे फूट स्लॅप खोलत असताना कोसळला.या दुर्घटनेत ३ कामगार जखमी झाले आहेत.दरम्यान त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
भवानी पेठ व कोंढवा येथील अग्निशामक दलाच्या प्रत्येकी दोन दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.अग्निशामक दलाचे एसडीओ समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गणपत पटे, सोपान कांबळे, अर्जुन यादव यांनी त्वरित धोकादायक स्लॅप काढून टाकला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App