PROUD AURANGABAD :देशातील टॉप 30 निर्यात करणार्या जिल्ह्यात औरंगाबाद! उद्योगनगरीचे घवघवीत यश !


केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने (MoCI) सूचीबद्ध केलेल्या भारतातील टॉप 30 निर्यात करणार्या जिल्ह्यांमध्ये औरंगाबाद जिल्हा 27 व्या क्रमांकावर आहे. PROUD AURANGABAD: Aurangabad in top 30 exporting districts of the country! Success of industrial city!


विशेष प्रतिनिधी

औरंगाबादः मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद .export निर्यात करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये उद्योगनगरी औरंगाबादने बाजी मारली आहे .कोरोनाच्या संकटातदेखील उद्योगनगरी औरंगाबादने या क्षेत्रात आपला दबदबा दाखवून दिला. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने (Ministry of commerce and Industry ) केलेल्या सर्वेक्षणानुसार, निर्यातीच्या बाबतीत औरंगाबाद जिल्ह्याने देशात 27 वे स्थान पटकावले आहे.

देशातील ज्या जिल्ह्यांमधून औद्योगिक निर्यात केली जाते, त्यांची टॉप 30 यादी आकडेवारीसह या मंत्रालयाकडून दरवर्षी जाहीर केली जाते. यंदा एप्रिल 2021 पासून ही प्रक्रिया सुरु करण्यात आली. एप्रिल ते सप्टेंबर या पहिल्याच सर्वेक्षणात महाराष्ट्राने बाजी मारली आहे. एप्रिल ते सप्टेंबर (2021-22) या कालावधीत नोंदवलेल्या शीर्ष पाच निर्यात वस्तूंवर प्रकाश टाकणारे जिल्हानिहाय निर्यात डेटाचे संकलन 10 डिसेंबर रोजी घोषित करण्यात आले आहे.



राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून मिळालेल्या इनपुटच्या आधारे ही यादी अद्ययावत करण्यात आली आहे. टॉप 30 जिल्ह्यांपैकी गुजरातमधील जामनगर आणि सुरत यांनी प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावला, तर मुंबई आणि मुंबई उपनगर (महाराष्ट्र) यांनी तिसरे आणि चौथे स्थान पटकावले. या यादीत चमकणाऱ्या महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये पुणे (५वा), ठाणे (१३वा), रायगड (१५वा) आणि पालघर (२८वा) यांचा समावेश आहे.

औरंगाबादेतून कशाची निर्यात?

औरंगाबादमधून मोठ्या प्रमाणावर इंजिनिअरिंगसाठी लागणारी उत्पादने निर्यात होतात. तसेच पैठणी साडी, कापड, मराठवाडा केसर, बीडचे सीताफळ आदींची निर्यात होते. प्लास्टिक व लिनोलिअम, मांस, दूध, कुक्कुट उत्पादने आदींची निर्यात औरंगाबादेतून होते.

मराठवाड्याचा केसर आंबा; कस्टर्ड ऍपलची निर्यात …

  • औरंगाबाद जिल्ह्यातून निर्यात केलेल्या विविध उत्पादनांची आणि सेवांची एकूण किंमत १७३४.२२ (अमेरिकन डॉलर दशलक्ष) इतकी होती.
  • अभियांत्रिकी, फार्मास्युटिकल्स आणि कृषी उत्पादने, अभियांत्रिकी सेवा, पैठणी साड्या आणि फॅब्रिक्स, मराठवाड्याचा केसर आंबा आणि बीडचे कस्टर्ड ऍपल यांचा समावेश आहे.

PROUD AURANGABAD: Aurangabad in top 30 exporting districts of the country! Success of industrial city!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात