प्रकाश आंबेडकरांनी भाष्य केले शिवसेनेवर, पण तुलना केली काँग्रेस -‘भाजपची, ती देखील आरपीआय बाबत


प्रतिनिधी

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले शिवसेनेवर, पण तुलना केली काँग्रेस भाजपची आणि ती देखील आरबीआय बाबत. कालच्या शिवसेनेच्या दोन मेळाव्यांबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि भाजप यांच्यात तुलना केली आहे. काँग्रेसने जशा इतिहासात एका आरपीआयच्या 10 आरपीआय केल्या, म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया फूट पाडून अनेक रिपब्लिकन पार्टी बनवल्या तसंच भाजपला एका शिवसेनेच्या 10 शिवसेना करायच्या आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे स्क्रिप्ट रायटिंग, दिग्दर्शन, कॅमेरामन वगैरे सगळे भाजपचेच होते, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. Prakash Ambedkar commented on Shiv Sena, but compared Congress-BJP

उद्धव ठाकरे यांना आपल्या शिवसेनेची भाजप मागे फरपट होऊ द्यायची नसेल आणि एकनाथ शिंदे यांना पॉलिटिकल स्पेस मिळवून द्यायची नसेल इथून पुढे येणारे प्रत्येक निवडणूक हिरीरीने लढवावी लागेल, असे भाकीतही प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवले. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे यांना दिलेला युतीचा प्रस्ताव आजही कायम आहे. परंतु त्यांनी अध्याप तो प्रस्ताव स्वीकारलेला नाही, अशी माहिती त्यांनी दिली.

शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदे यांचा गट वेगळा झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी नवी राजकीय खेळी करून संभाजी ब्रिगेड बरोबर आपल्या शिवसेनेची युती जरूर केली आहे. परंतु त्या आधीपासून प्रकाश आंबेडकरांनी दिलेला युतीचा प्रस्ताव मात्र त्यांनी अद्याप स्वीकारलेला नाही.

Prakash Ambedkar commented on Shiv Sena, but compared Congress-BJP

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात