चांदीचे धनुष्य, १११ साधूंचा आशीर्वाद; शिंदे गटाचा हिंदुत्वाचा शंखनाद


प्रतिनिधी

मुंबई : दसरा मेळाव्यावरून शिवसेनेच्या दोन्ही गटांत चढाओढ सुरू असताना, शिंदे गटाने ठाकरेंच्या एक पाऊल पुढे टाकत आपला हिंदुत्त्वाचा अजेंडा ठळकपणे अधोरेखित केला आहे. भाषणे सुरु होण्यापूर्वी व्यासपीठावर बड्या स्क्रीनवर दाखविलेल्या माहितीपटातून छत्रपती शिवाजी महाराज स्वातंत्र्यवीर सावरकर बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा गजर तर केलाच, पण त्याचबरोबर त्यांनी आपल्या व्यासपीठावर साधू-महंतांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांना स्थान देण्याचे नियोजन केले आहे. शिंदेंच्या मेळाव्यात १११ साधू शंखनाद केला असून, मुख्यमंत्र्यांना चांदीचे धनुष्य भेट दिले आहे. Silver bow, blessed by 111 sages; Shinde group’s conch of Hinduism

शिवसेनेतील फुटीनंतर पहिलाच दसरा मेळावा सुरू आहे. त्यामुळे दोन्ही गटांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे. सर्वाधिक शिवसैनिक कोणाच्या बाजूने, हे दाखविण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बीकेसी मैदानावर दाखल होताच. १११ साधूंनी शंखनाद करून एकनाथ शिंदे यांचा हिंदुत्वाचा वारसा अधोरेखित केला.

अयोध्येतील साधूंना निमंत्रण

अयोध्येतून आलेल्या साधू-महंतांना शिंदे गटाच्या दसरा मेळ्याव्यात विशेष स्थान देण्यात आले आहे. शंखनाद केल्यानंतर हे साधून मुख्यमंत्री शिंदे यांना चांदीचे धनुष्य आणि गदा भेट दिली.

Silver bow, blessed by 111 sages; Shinde group’s conch of Hinduism

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण