पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्येसंबंधींचे आरोप प्राजक्त तनपूरे यांनी फेटाळले

विशेष प्रतिनिधी

अहमदनगर – राहुरीचे पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्या प्रकरणात हात असल्याचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मंत्री प्राजक्त तनपूरे यांनी फेटाळले आहेत. या हत्येप्रकरणी भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी प्राजक्त तनपुरे यांचे नाव घेत आरोप केल्याने खळबळ उडाली असून त्यावरच तनपुरे यांनी याबाबत आपली बाजू मांडली आहे. prajakt tanpure rejects all alligations regarding journalist rohidas datir murder case

ज्या भूखंडाचा उल्लेख करण्यात येत आहे ती जागा बाबुराव तनपुरे ग्रामीण शिक्षण संस्थेने १९९२ मध्येच खरेदी केली आहे. शिवाय सोहम प्रॉपर्टीज ही फर्म माझ्या मेहुण्याच्या नावे आहे. माझा मुलगा सोहम १४ वर्षांचा असून त्याचा संस्थेशी संबध नाही. मुख्य म्हणजे पत्रकार रोहिदास दातीर आणि या फर्मचा कोणताही वाद नव्हता. शिवाजी कर्डिले यांनी केलेले सर्व आरोप खोटे आहेत, असे प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिली आहे.

शिवाजी कर्डिले यांचे आरोप

तत्पूर्वी, शिवाजी कर्डिले म्हणाले, की पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्येची आम्ही बारकाईने माहिती घेतली. यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी पोलिसांना माहिती दिली आहे की, राहुरीतील १८ एकर भूखंडाच्या मालकीसंबंधी रोहिदास दातीर हे सतत तक्रार अर्ज करून अडचणी वाढवत असल्याने त्यांची हत्या केली, असे आरोपींनी पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे आम्ही या भूखंडाची माहिती मिळविली. तेव्हा समजले की हा भूखंड पठारे नावाच्या एका शेतकऱ्याच्या नावावर आहे.



मात्र नगरपालिकेने तेथे आरक्षण टाकले होते. नंतर हे आरक्षण उठविण्यात आले. त्या जागेत आता सोहम ट्रॅन्सपोर्ट कंपनी आहे. ही कंपनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नावे असून सोहम हे त्यांच्या मुलाचे नाव आहे. या कंपनीत तनपुरे यांचे मेहुणे देशमुख आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कान्हू मोरे हे भागीदार आहेत.

दातीर यांना पठारे कुटुंबीयांनी मुखत्यारपत्र दिले होते. त्या आधारे दातीर या भूखंडासाठी कायदेशीर लढाई लढत होते. यावरून त्यांना मोरे यांच्याकडून अनेकदा धमक्या आल्या होत्या. दातीर यांच्या पत्नीने पोलिसांत तशी तक्रारही दिली होती. मोरे याच्या विरुद्ध दातीर यांनीही अनेकदा तक्रारी केल्या होत्या. मात्र, पोलिसांनी कारवाई केली नाही.

‘राहुरीत तनपुरे कुटुंबाची ही पद्धत आहे. एखादी मालमत्ता बळकवायची असेल तर तेथे आधी आरक्षण टाकतात, सौदा करतात आणि नंतर आरक्षण उठवून आणतात. त्यामुळे या प्रकरणात १८ एकरशी संबंधित जे जे कोणी सहभागी असतील त्यांच्याविरुद्ध संगनमताने दातीर यांचा खून केल्याचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अटक करावी. ही मागणी करण्यासाठी आम्ही पोलिस अधीक्षकांकडे आलो आहोत.

यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे आमच्याकडे आहेत. ती आम्ही पोलिसांना पुरवायला तयार आहोत. दातीर यांच्या पत्नीच्या जीवालाही धोका आहे. आम्ही त्यांना भेटून आलो. त्यावेळी त्यांनी बंदोबस्त देण्याची मागणी केली. मात्र, प्राजक्त तनपूरे यांनी शिवाजी कर्डिले यांनी केलेले सगळे आरोप फेटाळून लावले आहेत

prajakt tanpure rejects all alligations regarding journalist rohidas datir murder case


हे ही वाचा

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात