तीरा कामत नंतर वेदिका शिंदेचा जगण्यासाठी संघर्ष …! फक्त १०० रूपये वाचवू शकतात वेदिकाचा जीव ; इथे करा मदत


मुंबईतील तीरा कामत या पाच महिन्यांच्या चिमुकलीवर उपचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी धावून आले होते . तीरावर उपचारसााठी लागणाऱ्या १६ कोटी रुपयांच्या औषधावर आकारण्यात येणारे सर्व कर केंद्र सरकारने माफ केले होते .Vedika Shinde struggles to survive after Tira Kamat

फडणवीस यांनी दाखविलेली संवेदनशीलता आणि त्याला तितक्याच तत्परतेने पंतप्रधानांनी दिलेला प्रतिसाद यामुळे तीराला जीवनदान मिळाल. तसंच आता वेदिकालाही सर्वांनी साथ द्यावी ही अपेक्षा.


विशेष प्रतिनिधी

पुणे : वेदिकाला हवी आहे तुम्हां आम्हां सर्वांची मदत .सध्या जगण्यासाठी तीचा संघर्ष सुरू आहे. पिंपरी चिंचवडच्या वेदिका शिंदे या 9 महिन्याच्या चिमुरडीला स्पायनल मस्कुलर ऍट्रॉफी हा दुर्मिळ आजार झालाय.

यावर आई-वडिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला, तेव्हा या लहान चिमुरडीला दीर्घायुष्य हवं असेल तर तब्बल सोळा कोटी रुपयांची इंजेक्शन द्याव लागणार असल्याचं समजलं. पण तिच्या आई-वडिलांसाठी ही रक्कम म्हणजे अशक्यप्राय गोष्ट आहे. म्हणून त्यांनी सर्वांना मदतीचा हात मागीतला आहे.



प्रत्येकी शंभर रुपये दिल्यास अवघ्या सोळा लाख जनतेतून ही रक्कम उभी राहू शकते. तेव्हा एक कोवळा जीव वाचविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन वेदिकाच्या आई-वडिलांनी केलंय.

ह्या आजारामध्ये खूप जलद गतीने बाळाच्या नसा आणि स्नायू कमकुवत होतात. शिवाय जसजसे हे प्रमाण वाढत जाते तसतसे रुग्णाला श्वास घेणे, चालणे, शरीराची हालचाल करणे, मान धरणे या सगळ्या क्रिया करताना त्रास व्हायला सुरुवात होते

आणि वेळेवर उपचार मिळाले नाहीत तर शरीरातील सगळे भाग निकामी होऊन रुग्ण दगावतो. वेदिका ही आत्ता नऊ महिन्यांची आहे आणि तिला या समस्या सुरू झाल्या आहेत. वेदिकावरती पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे वेदिकाला तातडीनं हे इंजेक्शन देण्याची आवश्यकता आहे. महिन्याभरात हे इंजेक्शन मिळाले तरच वेदिका पूर्णपणे ठणठणीत बरी होऊ शकते. झोलगेन्स्मा असं याच नाव आहे. हे इंजेक्शन अमेरिकेमधून आयात करावे लागणार आहे

आणि याची किंमत सुमारे 16 कोटी रुपये आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च करण्याची परिस्थिती वेदिकाच्या पालकांची नाही, यासाठी त्यांना आर्थिक मदतीची अपेक्षा आहे. कारण वेदिकाची आई गृहिणी आहे तर वडिलांची एक छोटी कंपनी आहे. ज्यात वाहनांचे स्पेअर पार्टस बनवले जातात.

यातून त्यांना महिन्याकाठी सत्तर हजारांचा फायदा होतो, तर तीस लाखांचं कर्ज ही डोक्यावर आहे. हे पाहता एक रकमी सोळा कोटी रुपये जमा करणं त्यांच्यासाठी अशक्य आहे. त्यामुळे दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन जास्तीजास्त मदत करावी, अशी हात जोडून ते विनंती करतायेत.

आत्तापर्यंत अनेक दानशूरांनी मदतीचा हात पुढं केल्याने पंचवीस टक्के रक्कम जमा देखील झालीये. उर्वरित पंच्याहत्तर टक्क्याच्या मदतीमध्ये तुम्ही साक्षीदार व्हा आणि वेदिकाचं भविष्य उज्वल करा.

इथं करा मदत

1) Account number : 921010009091497

Name : Vedika Sourabh Shinde u/g Sourabh murlidhar shinde

Bank name – Axis bank

IFSC : UTIB0000269

Branch : Kalyani nagar, Pune

2) Milaap – https://milaap.org/fundraisers/support-vedika-shinde

3) Impact Guru – https://www.impactguru.com/fundraiser/help-baby-vedika-shinde

Vedika Shinde struggles to survive after Tira Kamat

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात