‘मोदी है तो मुमकिन है ! ‘ आनंदाची बातमी! आज संपला संघर्ष …तीरा कामतला मिळाले ‘ ते ‘ औषध

मुंबईतील तीरा कामत या पाच महिन्यांच्या चिमुकलीवर उपचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी धावून आले होते . तीरावर उपचारसााठी लागणाऱ्या १६ कोटी रुपयांच्या औषधावर आकारण्यात येणारे सर्व कर माफ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आणि तीराला नवीन आयुष्य मिळणार यात शंका उरली नाही . फडणवीस यांनी दाखविलेली संवेदनशीलता आणि त्याला तितक्याच तत्परतेने पंतप्रधानांनी दिलेला प्रतिसाद यामुळे तीरावरील उपचाराचा मार्ग प्रशस्त झाला .आज ते औषध तीराला देण्यात आल आहे .


विशेष प्रतिनिधी 

मुंबई : सहा महिन्याच्या तीराला जीन रिप्लेसमेंट उपचारांची गरज असून ‘झोलजेन्स्मा’ हे औषध हवे होते, ते अमेरिकेतून आले आणि आज डॉक्टरांनी ते औषध तीराला दिले. त्याकरिता तिला माहीमच्या पी. डी हिंदुजा रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हे औषध दिल्यानंतर शनिवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे. गेली काही महिने तीराच्या पालकांनी हे औषध तीराला मिळावे यासाठी मोठा संघर्ष केला. आज अखेर तिला हे औषध देण्यात आले असून तिची तब्येत लवकर ठिक व्हावी म्हणून सर्व प्रार्थना करत आहेत .

गुरुवारी हे औषध अमेरिकेतून रुग्णालयात पोहचले, हे औषध देण्याचा परवाना हिंदुजा रुग्णालयाकडे आहे. आज शुक्रवारी हे औषध तीराला सलाईन मार्फत देण्यात आले. अजून एक दिवस तिला रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात येईल आणि शनिवारी तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असून, तिला घरी सोडण्यात येणार आहे.

अशा पद्धतीने या आजारावर औषध मिळणारी तीरा मुंबईतील दुसरं मूल असून यापूर्वी अशाच स्वरूपाचे इंजेक्शन एका बाळाला महिन्यापूर्वीच याच रुग्णालयात देण्यात आलं आहे. देशात आतापर्यंत 11 बाळांना हे औषध देण्यात आलं आहे.

याप्रकरणी हिंदुजा रुग्णालयातील तीरावर उपचार करणाऱ्या लहान मुलांच्या न्यूरॉलॉजिस्ट डॉ. निलू देसाई यांनी सांगितलं की, “आज खरोखरच आनंदाचा दिवस आहे, महिनाभरापूर्वी हे औषध ऑर्डर करण्यात आलं होते आणि ते आले आणि आम्ही आज तीराला दिलेही. हे अशा पद्धतीने एकदाच औषध दिले जाते. हे औषध दिल्यानंतर नक्कीच तीराच्या प्रकृतीत सुधारणा होईल याची आम्हाला आशा आहे. ज्यापद्धतीने काही मुलांमध्ये हे औषध दिले आहे, त्यामध्ये काही चांगल्या सुधारणा दिसून आल्या आहेत. तीराच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी निश्चितच काही काळ जाणार आहे. तोपर्यंत सध्या तिला काही दिवस तरी अजून पोर्टेबल व्हेंटिलेटरवर ठेवावे लागणार आहे.”

त्या पुढे असेही म्हणाल्या कि, “आमच्याकडे अशा पद्धतीची 7-8 मुले आहेत, त्यांना या पद्धतीचे उपचार हवे आहेत ते उपचार देण्याकरिता आम्ही प्रयत्न करीत आहोत.

या वेदनामयी प्रवासाबद्दल बोलताना तीराचे वडील  मिहीर यांनी सांगतिले की, “आज आमच्यासाठी खरोखरच आनंदाचा क्षण आहे. ज्या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. तो दिवस आज उजाडला. तीराला हवे होते ते औषध दिले आहे. आता आम्ही तिच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची वाट पाहत आहोत. डॉक्टरांनी सांगितले आहे काही काळ तिच्या प्रकृतीत सुधारणा होण्याकरिता जाणार आहेत. आमच्या या लढ्यात मदत करण्याकरिता समाजातील खूप लोकांनी मदत केली आहे त्या सर्वांचा मी आभारी आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*