विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कॉर्पोरेशन लिमिटेड ने 5200 शेतकऱ्यांचा वीज पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतल्या नंतर जमा झालेली थकबाकी विज बिलाची किंमत आश्चर्य चकित करणारी आहे. ही किंमत 2.52 कोटी इतकी आहे.
Power outage for farmers; 2.52 crore outstanding electricity bill has been paid by the farmers
वीज मंडळाने हा निर्णय घेतला होता कारण बऱ्याच शेतकऱ्यांचे वीज बिल भरणे बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होते. शेती मध्ये पाण्याचा वापर खूप असतो. पावसाळा ओसरल्या नंतर विहिरीतील पाणी उपसण्यासाठी मोटरचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. कोल्हापूर सांगली या भागात ऊस हे प्रमुख पीक आहे. ह्या पिकासाठी पाण्याची आवश्यकता जास्त असते.
Power Crisis In Punjab : पंजाबात वीज संकट गडद, आंदोलन करणारे आप खा. भगवंत मान आणि आ. हरपाल चिमा पोलिसांच्या ताब्यात
कोल्हापूर मधील 2800 शेतकऱ्यांनी 1.28 कोटी रुपयांची थकबाकी रक्कम भरली आहे. तर सांगली जिल्ह्यातील 2400 शेतकऱ्यांनी 1.24 कोटी रुपयांची थकबाकी रक्कम भरली आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे एक ऑफर देण्यात आली आहे. एका इंस्टॉलमेंटमध्ये पूर्ण रक्कम भरल्यास 50% डिस्काउंट देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांकडून ह्या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 31 मार्च, 2022 पर्यंत ही स्कीम लागू केलेली असेल. तोवर वीज पुरवठा बंद करण्याचे सत्र चालू राहणार आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सांगली जिल्ह्यातील महेश खराडे यांनी बिलामध्ये दुरुस्ती केली नसल्यास बिल भरणार नाही. असा इशारा दिला आहे. लॉक डाऊन दरम्यानच्या काळात बनवलेले बिल हे वाढीव आहे. ह्या मध्ये दुरुस्ती झाली पाहीजे असे त्यांचे म्हणणे आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App