भाजपच्या वतीने सोमवारी (ता.२९) महावितरण कार्यालयाला कुलुप ठोकून शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे. Hingoli: BJP locks MSEDCL office
विशेष प्रतिनिधी
हिंगोली : सरकार शेतकऱ्यांच्या वीजपंपाचे कनेक्शन तोडत आहे. विजबिल भरल्याशिवाय विज जोडणार नसुन सक्तीने वसुल करित असल्याने शेतकरी ऐन हंगामात मेटाकुटीला आला आहे. तसेच महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांकडून बळजबरीने वीजबिल वसुल करीत आहे.
त्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने सोमवारी (ता.२९) महावितरण कार्यालयाला कुलुप ठोकून शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे.
दरम्यान, शेतकरी हा दुष्काळ, अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्ती या सर्व बाबीने बेजार असतांना बिल न भरल्यामुळे बळजबरीने विज बंद करू नये. बळजबरीने विद्युत बिल वसुल करु नये व शेतकऱ्याला कायम स्वरुपी अल्प दरात वीज मिळावी. आठ तास खंड न पडता विज मिळावी, आठ तास सोडुन इतर वेळात दुरुस्ती कामे करावी या शेतकरी हिताच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांना लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेतले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App