लोणी काळभोर येथे पोलीस शिपायास लाच घेताना अटक


विशेष प्रतिनिधी

पुणे : एसटी कर्मचाऱ्यांचा सध्या संप चालू आहे. त्यामुळे पब्लिक वाहतूक बंद आहे. बऱ्याच प्रायव्हेट वाहनांना वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आली आहे. याच पाश्र्वभूमीवर पुणे पोलिसांनी लोणी काळभोर ट्राफिक ब्रांचमधील एका पोलिस शिपायाला 5000 ची लाच घेताना अटक केले आहे. या कर्मचार्याविरुद्ध एका ट्रॅव्हल एजन्सीच्या मॅनेजरने तक्रार दाखल केली होती. शनिवारी लोणीकाळभोर नाक्याजवळील कवडीपाट येथे ही कारवाई करण्यात आली.

Police constable arrested for taking bribe at Loni Kalbhor


लाचखोरी जोखमीबाबत भारताला जगात ८२ वे स्थान , ट्रेसचा अहवाल


पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, सदर पोलीस शिपाई स्वारगेट ते सोलापूर अशी प्रवाशांची वाहतूक करत असणाऱ्या गाड्यांमधील वाहका कडून 6000 रुपयांची लाचेची मागणी करत होते. प्रत्येक महिन्याला त्यांना 6000 रुपये द्यावे लागत होते. सुहास भास्कर हजारे वय वर्षे 35 असे या अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तक्रार पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानंतर पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलिस अधीक्षक सूरज गुरव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.

Police constable arrested for taking bribe at Loni Kalbhor

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात