जेवण करत असतानाच मंडपात घुसून पोलीसांनी विदर्भवादी आंदोलकांना केली अटक, सरकारी दडपणाला जुमानणार नसल्याचा इशारा

विशेष प्रतिनिधी

नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या सुरू असलेल्या आंदोलनात पोलीसांच्या अत्याचारामुळे संताप व्यक्त केला जात आहे. विदर्भवाद्यांकडून अर्धनग्न आंदोलनानंतर कार्यकर्ते जेवण करत असतानाच थेट मंडपात घुसून पोलीसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यांना चौकापर्यंत पायी नेत व्हॅनमध्ये कोंबून पोलीस लाइन टाकळी येथे नेले.Police arrest Vidarbha activists while eating , government repression

आंदोलनाच्या चौथ्या दिवशी विदर्भवाद्यांनी विदर्भ चंडिका मंदिर परिसरात अर्धनग्न आंदोलन केले. पोलिसांचा मोठा ताफा मंडपात दाखल झाला. तीन व्हॅनही सज्ज होत्या. अटक करण्यासाठी आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे पुन्हा घोषणाबाजी झाली. अटक करा, मात्र त्यापूर्वी सर्वांना जेवण करू द्या, अशी विनंती मुख्य संयोजक राम नेवले, माजी आमदार वामनराव चटप आदींनी केली.



आंदोलकांपैकी एक असलेले मुकेश मासूरकर भोवळ येऊन पडल्यावर त्यांना उपचारासाठी नेल्यानंतर पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन बाहेर काढले. पोलिसांनी सर्व बॅनर, फलक जप्त केले. पेंडालही काढून नेला. मंदिरावर लावण्यात आलेला स्पीकरही जप्त केला.

पोलिसांच्या या कारवाईने आंदोलन थांबणार नाही. १५ ऑगस्ट पर्यंत नियोजित आंदोलन आहे, ते सुरूच राहील, असा इशारा नेवले आणि चटप यांनी दिला आहे. विदर्भ निर्मितीसाठी आणि येथील जनतेच्या हक्कासाठी हे आंदोलन आहे. सरकारने दडपण आणण्याऐवजी वेगळे विदर्भ राज्य निर्मितीचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Police arrest Vidarbha activists while eating , government repression

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात