PM Modi Pune Metro : पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा; मुख्यमंत्र्यांनी हजेरी टाळली!!


विशेष प्रतिनिधी

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुण्याचा दौरा आधीच दोन दिवसांपासून गाजत होता, त्याला स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दौऱ्याच्या पूर्वसंध्येला विरोध केला होता. त्यात भर म्हणून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील पुण्यात पंतप्रधान मोदी यांच्या स्वागताला गैरहजर राहिले. वास्तविक राजशिष्टाचारानुसार पंतप्रधान मोदी यांचे स्वागत करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री विमानतळावर उपस्थित राहणे अनिवार्य असते, मात्र मुख्यमंत्री यांनी याला गैरहजर राहून अप्रत्यक्षपणे नाराजी दाखवली. PM Modi Pune Metro: PM Modi’s visit to Pune; CM avoids attendance !!

स्वागतासाठी सुभाष देसाई

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा पुणे विमानतळावर आले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई होते. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, ले.ज.जय सिंह नैन, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांची गैरहजेरी लक्ष वेधून घेत होती.



मोदींना राष्ट्रवादी, काँग्रेसचा विरोध

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी पुण्याच्या दौऱ्यावर आले आले, तेंव्हा पूर्वनियोजनुसार त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून त्यांच्या दौऱ्याचा निषेध करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी मोदींचा निषेध कारणारे फलक हाती घेतले होते, तसेच मोदींच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येत होती. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या आणि अर्धवट पुणेरी मेट्रोचे काम करुन पुणेकरांची फसवणूक करणाऱ्या, मोदींनी परत जावे, अशा घोषणा आंदोलक करत होते.

PM Modi Pune Metro : PM Modi’s visit to Pune; CM avoids attendance !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात