PM Modi interact With Pune Farmer On World Environment Day bio farming

WATCH : पुण्यातील शेतकऱ्याशी पीएम मोदींचा संवाद, शेतकरी वाघमारेंनी सांगितले जैविक खताचे फायदे

PM Modi interact With Pune Farmer : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विविध क्षेत्रांतील व्यक्तींची ऑनलाइन भेट घेतली. यावेळी पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील शेतकरी बाळू नाथू वाघमारेंनाही संधी मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाघमारेंशी मराठीतून संवाद साधून त्यांच्या शेतीची माहिती घेतली. बाळू नाथू वाघमारे हे जैविक खतांचा वापर आपल्या शेतीत करतात. त्यांनी जैविक खतांमुळे होत असलेल्या फायद्यांची पंतप्रधानांना माहिती दिली. पंतप्रधानांच्या प्रश्नांना वाघमारेंनीही उत्तरे दिली. यावेळी वाघमारे कुटुंबातील महिला सदस्यही उपस्थित होते. या महिला शेतकऱ्यांनाही पंतप्रधानांनी प्रणाम करत कोरोना काळात काळजी घेण्याचे आवाहन केले. PM Modi interact With Pune Farmer On World Environment Day bio farming

महत्त्वाच्या बातम्या