Navi Mumbai Municipal Corporation to deposit Rs 1000 in student's bank account for Unlimited Net Pack

स्वागतार्ह : ऑनलाइन शिक्षणात खंड पडू नये म्हणून नवी मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय, नेटपॅकसाठी 35 हजार विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी 1 हजार रुपये

Navi Mumbai Municipal Corporation : कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाकडे वळावे लागले आहे. या माध्यमातून शिक्षण घेताना इंटरनेट कनेक्टिव्हिटी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. नेटपॅक संपल्यामुळे अनेकांच्या शिक्षणात खंड पडतो. नवी मुंबई महापालिकेने विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणात खंड पडू नये म्हणून नेटपॅकसाठी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात 1 हजार रुपये जमा करण्याचा स्वागतार्ह निर्णय घेतला आहे. Navi Mumbai Municipal Corporation to deposit Rs 1000 in student’s bank account for Unlimited Net Pack


विशेष प्रतिनिधी

नवी मुंबई : कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाकडे (Online Education) वळावे लागले आहे. या माध्यमातून शिक्षण घेताना इंटरनेट कनेक्टिव्हिटी (Internet Connectivity) अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. नेटपॅक (Net Pack) संपल्यामुळे अनेकांच्या शिक्षणात खंड पडतो. नवी मुंबई महापालिकेने (New Mumbai Municipal Corporation) विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणात खंड पडू नये म्हणून नेटपॅकसाठी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात 1 हजार रुपये जमा करण्याचा स्वागतार्ह निर्णय घेतला आहे.

कोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. एरवी जून महिन्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सत्रांना सुरुवात होत असते. तथापि, यावेळी कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षणावर विसंबून राहण्याची विद्यार्थ्यांवर वेळ आली आहे. पहिल्या सहामाहीत शाळांमध्ये प्रत्यक्ष वर्गात न भरवता ऑनलाईन पद्धतीनुसारच विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार आहे.

विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी पालिकेने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. शाळांमधील अधिकाधिक विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण उपलब्ध होण्याकरिता थेट नेटपॅकची रक्कम उपलब्ध करून देण्यात आली आहे. पालिकेच्या या विद्यार्थीहिताय निर्णयामुळे 35 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या पालकांना दिलासा मिळणार आहे.

Navi Mumbai Municipal Corporation to deposit Rs 1000 in student’s bank account for Unlimited Net Pack

महत्त्वाच्या बातम्या