मेहूल चोक्सी म्हणतो मी कायदा पाळणारा नागरिक, पळून आलो नाही तर उपचारसाठी भारत सोडला, भारतीय अधिकाऱ्यांनी डॉमिनिका येथे येऊन माझी चौकशी करावी


मी कायदा पाळणारा नागरिक आहे. यापूर्वी माझ्यावरवर कोणतेही आरोप झालेले नाहीत. आहे. त्यामुळे भारतीय अधिकाऱ्यांनी डॉमिनिका येथे येऊन माझी चौकशी करावी, असे पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चौक्सी याने म्हटले आहे. आपण पळून आलेलो नाही तर उपचारासाठी भारत सोडल्याचेही त्याने म्हटले आहे.  Mehul Choksi says I am a law abiding citizen, I did not flee but left India for treatment, Indian authorities should come to Dominica and interrogate me


विशेष प्रतिनिधी

डॉमिनिका : मी कायदा पाळणारा नागरिक आहे. यापूर्वी माझ्यावरवर कोणतेही आरोप झालेले नाहीत. आहे. त्यामुळे भारतीय अधिकाऱ्यांनी डॉमिनिका येथे येऊन माझी चौकशी करावी, असे पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चौक्सी याने म्हटले आहे. आपण पळून आलेलो नाही तर उपचारासाठी भारत सोडल्याचेही त्याने म्हटले आहे.

डॉमिनिका उच्च न्यायालयात चोक्सीने प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. यामध्ये त्याने भारतीय अधिकाऱ्यांना डॉमिनिका येथे येण्यास आणि त्याच्या तपासासंदर्भात कोणतेही प्रश्न विचारण्यास सांगितले आहे. त्याने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, माझ्याविरूद्ध केलेल्या कोणत्याही तपासासंदर्भात भारतीय अधिकारी प्रश्न विचारू शकतात. मी त्यांना येथे येऊन प्रश्न विचारण्याची ऑफर देतो. मी भारतातील कोणतीही एजन्सी टाळण्याचा प्रयत्न केला नाही. जेव्हा मी अमेरिकेत उपचारांसाठी भारत सोडत होतो, तेव्हा कोणत्याही एजन्सीने माझ्याविरूद्ध वॉरंट काढला नव्हता. डॉमिनिकामधील न्यायालयीन कार्यवाही टाळण्याचा माझा कोणताही हेतू नाही. रेड कॉर्नर नोटीस बजावल्यामुळे माझ्या सुटण्याची कोणतीही शक्यता नाही. रेड कॉर्नर नोटीसचा कोणताही इंटरनॅशनल वॉरंट नसतो, ती फक्त एक अपील असते, जी आत्मसमर्पणासाठी (सरेंडर) असते. मला शोधून काढा आणि भारताला प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू करावी, असे आवाहन इंटरपोलने भारताच्या वतीने केले आहे. ही प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉमिनिका सोडण्याचा माझा हेतू नाही.



चोक्सीने आपल्याला न्यायालयाच्या परवानगीने अँटीगुआ येथे जायचे आहे असेही म्हटले आहे. माझ्यविरुध्द अँटीगुआ आणि बारबूडा येथे दोन प्रकरणे प्रलंबित आहेत. मी स्वत: हे खटले दाखल केले आहेत. ते खटले मला भारतात प्रत्यार्पण करावे की नाही याबद्दलचे आहेत. मी अँटीगुआ कोर्टात प्रत्येक सुनावणीत उपस्थित राहिलो आहे. मी कायदा पाळणारा नागरिक आहे. यापूर्वी माझ्यावर कोणतेही आरोप झालेले नाहीत. मला भीती वाटते की मी पोलिसांच्या ताब्यात राहिल्यास, माझी तब्येत आणखी खालावेल. मी 62 वर्षांचा आहे आणि मला आरोग्याच्या गंभीर समस्या आहेत. मला मधुमेह आहे, मेंदूमध्ये गाठ आहे, हृदयविकाराचा त्रास आहे आणि इतर समस्या देखील आहेत. मला जामीन देण्यात यावा, अशी मागणी त्याने केली आहे.

न्यायालयाचे म्हणणे असेल तर मी रोख रक्कमेसाठी जास्तीत जास्त रक्कम देऊ शकतो. मी माझ्या विरोधात चुकीच्या पध्दतीने एंट्रीचे प्रकरण संपेपर्यंत येथे राहिल, पळून जाणार नाही. मी येथे राहण्याचा खर्चही उचलेल. मी माझ्या सुरक्षेचा खर्चही उचलू शकतो, मला डॉमिनिकाकडून कोणत्याही प्रकारची सुरक्षा नको आहे.
मेहुल चौकसी अँटीगुआचे नागरिकत्व घेऊन 2018 पासून तेथेच राहत होता. मात्र 23 मेला अचानक तेथून बेपत्ता झाला होता. याच्या 2 दिवसांनंतर त्याला डोमिनिकामधून ताब्यात घेण्यात आले होते. या संपूर्ण प्रकरणामध्ये अँटीगुआचे पंतप्रधान गॅस्टन ब्राउनचे एक पत्रही समोर आले आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की, मेहुलने नागरिकत्त्वासंबंधीत माहिती लपवली होती. 14 आॅक्टोबर 2019 ला लिहिलेल्या पत्रामध्ये ब्राउन यांनी म्हटले होते, ‘मी अँटीगुआ आणि बारबूडा नागरिकता अधिनियम, कॅप 22 च्या कलम 8 नुसार एक आदेश देण्याचा प्रस्ताव ठेवतो, जेणेकरुन तथ्य मुद्दामून लपवण्याच्या आधारावर अँटीगुआ आणि बारबूडा आणि नागरिकतेपासून वंचित केले जाऊ शकेल.

चौकसीवर डोमिनिकामध्ये बेकायदेशीररित्या प्रवेश केल्याचा आरोप आहे, परंतु त्याने त्याच्या कस्टडीला उच्च न्यायालयात आव्हान केले आहे. चौकसीने दावा केला आहे की त्याला अँटिगुआ-बाबुर्डा येथून अपहरण करुन डोमिनिकामध्ये आणले गेले. चोक्सीची पत्नी प्रीती चोक्सीनेही चोक्सीला बार्बरा जराबिका नावाच्या महिलेने कट करून डॉमिनिका येथे अपहरण करून नेल्याचे म्हटले आहे. बार्बरा ही भारताची एजंट असून तिने चोक्सीला जाळ्यात अडकविण्यासाठी त्याच्या घरासमोर भाड्याने घर घेतले होते. मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने त्याच्याशी ओळख वाढविली. त्यानंतर प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याला घरी बोलावले. तेथे तिच्या सात-आठ साथीदारांनी चोक्सीला जबर मारहाण केली आणि अपहरण करून डॉमिनिकाला नेले असा आरोप प्रीती चोक्सी यांनी केला आहे.

Mehul Choksi says I am a law abiding citizen, I did not flee but left India for treatment, Indian authorities should come to Dominica and interrogate me

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात