प्रतिनिधी
मुंबई : राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे यांनी आपली अपक्ष उमेदवारी जाहीर केली असली तरी शरद पवारांनी त्यांना राष्ट्रवादीची जादा मते देण्याचा शब्द दिला आहे. Pawar’s word to give extra votes to NCP
पण शिवसेनेने निवडणुकीच्या मैदानात आपला दुसरा उमेदवार आणायचे ठरवून संभाजी राजांची “अपक्ष” उमेदवारी अडचणीत आणली आहे. पवारांनी पहिल्यांदाच संभाजीराजांना जादा मते देण्याचा शब्द दिल्यामुळे ते “अपक्ष” उमेदवार असले तरी प्रत्यक्षात ते राजकीय दृष्ट्या राष्ट्रवादी पुरस्कृतच उमेदवार राहतील.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेने पवित्रा बदलत राज्यसभेच्या निवडणुकीत आपला एकच उमेदवार निवडून येणे शक्य असताना दुसरा उमेदवार स्पर्धेत उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संभाजी राजे यांची अपक्ष म्हणून लढताना कसोटी लागणार आहे.
राज्यसभेच्या 57 जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक होणार आहे. त्यापैकी महाराष्ट्रातून सहा उमेदवार निवडून जाणार आहेत. ही निवडणूक आपण अपक्ष म्हणून लढवणार असल्याचे संभाजी राजे यांनी जाहीर केले आहे. त्यासाठी त्यांनी राज्यातील सर्व पक्षांच्या पाठिंब्यासाठी आवाहनही केले आहे. पण आता या निवडणुकीसाठी शिवसेनेने संभाजीराजेंची कोंडी केल्याची माहिती मिळत आहे. संभाजी राजे यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर आपण त्यांना उमेदवार देऊ, अन्यथा आम्ही आमचा सहावा उमेदवार मैदानात उतरवू, अशी भूमिका शिवसेनेने घेतल्याची माहिती मिळत आहे.
सोबत आले तर ठीक, नाहीतर…
राज्यसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार असल्याचे म्हटल्यानंतर संभाजी राजे यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पाठिंबा दर्शवला. तसेच राज्यातील सर्व पक्षांनी आपल्याला पाठिंबा द्यावा, असं आवाहन संभाजी राजे यांनी केल्यानंतर महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेस याबाबत काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. पण जर संभाजी राजेंनी शिवसेनेत प्रवेश केला तर त्यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात येईल. ते जर आपल्या भूमिकेवर ठाम राहणार असतील, तर आम्ही शिवसेनेकडून सहावा उमेदवार उभा करू, असे म्हणत शिवसेनेने संभाजी राजे यांना कोंडीत पकडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता संभाजीराजे यावर काय भूमिका घेतात हे येत्या काळात पहायला मिळणार आहे.
राष्ट्रवादी शब्द पाळणार की मित्रत्व जपणार?
राज्यसभा निवडणुकीत संभाजी राजे यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उरलेली सर्व मते देण्यात येतील, असा शब्द राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पण आता जर शिवसेनेने आपला उमेदवार मैदानात उतरवला, तर राष्ट्रवादी संभाजी राजेंना दिलेला शब्द पाळणार की शिवसेनेसोबतचे राजकीय मित्रत्व जपणार, हे पहाणे आता महत्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App