पवार आजी पुन्हा पुण्याच्या रस्त्यावर; पोट भरण्यासाठी लाठी-काठीचे खेळ


वृत्तसंस्था

पुणे : कुटुंबाचे पोट भरण्यासाठी पवार आजीबाई पुन्हा रस्त्यावर आल्या आहेत. या पवार आजीबाई कोण, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना ? अहो त्या गेल्या वर्षी जुलैमध्ये रस्त्यावर कसरतीचे खेळ सादर करून प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. Shantabai pawar is on pune streets for Livelihood

त्यांना उतारवयात त्रास नको म्हणून सेलिब्रेटींनी लाखो रुपयांची मदतही केली होती. पण, लॉकडाऊन झाल्यानंतर त्यांनी आता पुन्हा लाठी- काठीचे खेळ सादर करून उपजीविकेस सुरुवात केली आहे.

शांताबाई पवार,असे त्यांचे नाव आहे. 85 वर्षांच्या आजीबाई गेल्या वर्षी जुलैमध्ये रस्त्यावर लाठीचे खेळ सादर करू लागल्या. पाऊस, उन्हाचा विचार न करता त्यांनी पोट भरण्यासाठी कला सादर केली. हे पाहून अनेक सेलिब्रेटी त्यांच्या मदतीसाठी धावले होते. आता तब्बल त्या वर्ष झाल्यानंतर रस्त्यावर दिसू लागल्या असून सोशल मीडियावर पुन्हा झळकू लागल्या आहेत.

बॉलिवुड अभिनेता सोनू सूद, रितेश देशमुख, गायिका नेहा कक्कड, महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अनेकांनी शांताबाई पवार यांना मदतीचा हात दिला. त्याची शांताबाईंनी आठवण ठेवली आहे. पण तात्पुरत्या मदतीमुळे शांताबाई आणि त्यांच्या कुटुंबाचं पोट भरेना झालं. शेवटी त्यांना पुन्हा रस्त्यावर उतरून त्यांच्या दोन्ही काठ्या कसरतीसाठी हातात घ्याव्या लागल्या.

Shantabai pawar is on pune streets for Livelihood

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात