तर तालुक्यात पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल : छगन भुजबळ


विशेष प्रतिनिधी

येवला : राज्याच्या अन्न व पुरवठा विभागाच्या मंत्री पदासोबतच नाशिकचे पालकमंत्री असलेले छगन भुजबळ आज जिल्ह्यातील येवला तालुक्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी कोरोना रूग्णांच्या सतत वाढणार्या संख्येबद्दल चिंता व्यक्त केली. त्याचप्रमाणे त्यांनी लोकांना इशाराही दिला आहे की, जर लोकांनी कोरोना संदर्भात नियम पाळले नाहीत तर तालुक्यात पुन्हा लॉक डाऊन लागू करण्याचा करण्यात येईल. लॉक डाऊन टाळायचा असेल तर नियमांचं काटेकोरपणे पालन करने गरजेचे आहे. असे भुजबळांनी स्पष्ट केले आहे.

‘Or else lockdown may happen once again ..’ : chagan bhujbal

राज्यात मंदिरे चालू झाली आहेत, शाळा चालू होतायत, त्यामुळे कोरोना नियमांचे हळूहळू पालन करण्याचे लोक विसरत चालले आहेत. लसीकरणाचा वेग देखील वाढला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात येत आहे. अशावेळी पुन्हा तिसरी लाट येऊ नये यासंदर्भात योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे, असेदेखील छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.


छगन भुजबळ : कोरोना संकट दूर होऊ दे ; सप्तश्रृंगी चरणी केली प्रार्थना


सर्व काळजी घेऊनदेखील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. इथे व्हॅक्सिनचा पुरवठा वाढलेला आहे. लसीकरणाचा कार्यक्रम सुरू आहे. कार्यकर्ते लोकांना बोलावून लसीकरण करत आहे. त्यामुळे थोडा आधार मिळतच आहे. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये लोकांनी  काळजी घेणे आवश्यक आहे असे त्यांनी म्हटले आहे.

‘Or else lockdown may happen once again ..’ : chagan bhujbal

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण