वृत्तसंस्था
पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी (ता.२६ )पुण्यात ‘सागरा प्राण तळमळला’ हा विनामूल्य कार्यक्रम आयोजित केला आहे. यावेळी एअर मार्शल भूषण गोखले, अनिल नेने लंडन, कॅप्टन निलेश गायकवाड यांची विशेष उपस्थिती आहे. On the occasion of the death anniversary of Swatantryaveer Savarkar ‘Sagara Pran Talamalala’ program in Pune
गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट, पुणे येथे हा विशेष कार्यक्रम होणार आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांना आदरांजली या कार्यक्रमात अर्पण केली जाणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गीतांचे गायन हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहेच, पण लतादीदींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जितेंद्र अभ्यंकर, स्वरदा गोडबोले, व रसिका गानू हे पुण्यातील कलाकार आपली गानसेवा अर्पण करणार आहेत.
विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, शौनक अभिषेकी, डॉ. सलील कुलकर्णी, सुधीर गाडगीळ, राहूल सोलापूरकर, प्रवीण जोशी, सतीश पाकणीकर तसेच काही मान्यवर दीदींबद्दलचे त्यांचे अनुभवही सांगणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील टाकळी सिकंदर येथे ग्रामीण भागातील मुलांसाठी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवा सैनिक शाळा सुरू झाली आहे. या शाळेचे संस्थापक आबासाहेब कांबळे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे. समाजाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आबासाहेब कांबळे यांचा सत्कार करून कार्यक्रमाचा जमलेला निधी शाळेला देण्याचा मानस आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App