प्रतिनिधी
नवी दिल्ली : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी मुंबईत शंभर कोटींचा कोविड घोटाळा केला आहे, असा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. स्वतः संजय राऊत यांनी पुढे येऊन आपली आणि आपल्या कुटुंबीयांची कोणत्या उद्योगांमध्ये किती आणि कशी भागीदारी आहे?, हे जाहीर करावे अन्यथा आपणच लवकर ते जाहीर करू. पण हा घोटाळा शंभर कोटी रुपयांचा आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला होता.On the allegation of Kirit Somaiya, Sanjay Raut said, this is a form of eating dung and smelling the other’s mouth !!
या आरोपाला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. माझ्यावर असले खटले दाखल झाले आहेत. मी खटल्यांना घाबरत नाही आणि आरोप तर असे अनेकांवर होतात. पंतप्रधान मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर आरोप झालेले आहेत त्यांनी त्याची उत्तरे दिली का? शिवाय किरीट सोमय्या यांचे आरोप म्हणजे स्वतःचे शेण खायचे आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घ्यायचा असला हा प्रकार सुरू आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
किरीट सोमय्या यांचा संजय राऊत आणि कुटुंबीयांवर 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, कुठे-कुठे भागीदारी ते स्वत:च जाहीर करण्याचे आव्हान
संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशात शिवसेना 50 जागी उमेदवार उभे करेल आणि भाजप उमेदवारांचा पराभव करण्यासाठी मदत करेल, असे म्हटले आहे. शिवसेना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 100 जागा लढविण्याचा इरादा राखून असल्याचे वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App