पोलीसांच्या बदल्यांसाठी अनिल देशमुख आणि अनिल परब यांच्या व्हायच्या गुप्त बैठका, देशमुखांच्या स्वीय सहाय्यकांचाच धक्कादायक खुलासा


विशेष प्रतिनिधी

मुंबई: राज्यातील पोलिसांच्या बदल्यांसाठी शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब आणि तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात सह्याद्री अतिथीगृह आणि ज्ञानेश्वरी बंगल्यावर गुप्त बैठका व्हायचा, असा धक्कादायक खुलासा देशमुख यांचे विशेष कार्य अधिकारी रवी व्हटकर यांनी केला आहे. व्हटकर यांनी सक्तवसूली संचालनालयाकडे (एऊ) नोंदविलेल्या जबाबात ही माहिती दिली आहे.Anil Deshmukh and Anil Parab’s secret meetings for police transfers, shocking revelation of Deshmukh’s personal aides

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर केलेल्या पोलिसांना 100 कोटींच्या वसूलीचे टार्गेट दिल्याच्या गंभीर आरोपांसह भ्रष्टाचार व गैरकारभाराच्या आरोपांवरुन गुन्हा दाखल करुन ईडी तपास करत आहे. यात देशमुख यांच्या गृहमंत्री असल्याच्या काळात झालेल्या पोलीस बदल्यांबाबत ईडीने देशमुखांच्या दोन्ही स्वीय सहायकांसह गृहमंत्रालयातील अधिकाऱ्यांचे जबाब नोंदविले आहेत. यात देशमुख यांचे विशेष कार्य अधिकारी रवी व्हटकर यांनी ईडीकडे नोंदविलेल्या जबाबाचा समावेश आहे.व्हटकर यांनी ईडीला दिलेल्या जबाबानुसार, पोलीस आस्थापन मंडळ हे केवळ नावापूरते आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय हा आधीच घेतला जात होता. राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्यांपूर्वी देशमुख आणि परब यांच्यात सह्याद्री अतिथी गृह व ज्ञानेश्वरी बंगल्यावर गुप्त बैठक व्हायची. या बैठकीला माझ्यासह देशमुख यांचे स्वीय सहायक संजीव पालांडे हेसूद्धा उपस्थित असल्याचे व्हटकर यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यातील मंत्री, आमदार आणि पक्षांचे नेते हे देशमुख यांच्याकडे त्यांच्याकडील काही पोलीस अधिकाºयांच्या बदल्यांची नावे पाठवत होते. यातील राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाकडून आलेल्या याद्या माझ्याकडे यायच्या. तर, शिवसेनेकडील याद्या परब आणून द्यायचे

आपल्याकडे पोलीस निरीक्षक दर्जापर्यंतच्या अधिकाºयांच्या याद्या तयार करण्याची जबाबदारी होती. पलांडे याच्यावर सहायक पोलीस आयुक्त, पोलीस उपअधिक्षक पदापासून उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या याद्यांची जबाबदारी होती, अशी माहिती व्हटकर यांनी आपल्या जबाबात दिली आहे.

Anil Deshmukh and Anil Parab’s secret meetings for police transfers, shocking revelation of Deshmukh’s personal aides

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण