OBC reservation : ठाकरे – पवार सरकारचा ओबीसी आरक्षणाला केवळ “धक्का” नव्हे, तर “धोका”!!; पंकजा मुंडेंचे शरसंधान


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राच्या ठाकरे – पवार सरकारने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला केवळ धक्का लावलेला नसून कायमचा धोका उत्पन्न केलेला आहे, असे शरसंधान भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनी केले आहे. OBC reservation: Thackeray – Pawar government’s OBC reservation is not just a “push”, but a “threat” !!; Pankaja Munde’s Sharasandhan

ओबीसी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टाने ठाकरे – पवार सरकारला चपराक हाणली. त्यावर पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ओबीसी आरक्षणाला “धक्का” लागल्याचे इतके दिवस दिसत होते, पण आता ओबीसी आरक्षणाला “धोका” आहे. जर मानसिकता असती ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय निवडणुका घ्यायची, तर अशाप्रकारचा ओबड-धोबड अहवाल सादर केला गेला नसता. राज्य शासनाने हा अहवाल गंभीरपणे तयार करून दिला असता, जेणेकरून त्यावर सुप्रीम कोर्टाने योग्य निर्णयही दिला असता. त्यामुळे हे स्पष्टपणे दिसतंय की, ओबीसी आरक्षणाचा बळी घेण्याचं काम हे सरकारकडून करण्यात येत आहे, अशीही खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.



पुढे पंकजा मुंडे असेही म्हणाल्यात, नेहमीच सहकार्याची भूमिका ठेवली. ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत राजकारण करायचे नाही, सगळ्यांनी मिळून राजकीय भूमिका बाजूला ठेवून ओबीसींसाठी भूमिका मांडयची, असे ठरवलेले आहे. त्यामुळे मी आज जी भूमिका मांडतेय, ती राजकीय नाही. ती समस्त ओबीसींच्या राजकीय भविष्यासाठी चिंता करणाऱ्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे. न्यायालयाने सांगितले आहे, तुम्हाला लोकसंख्येचा आकडा आवश्यक नाही. तुम्हाला तुमच्या राज्यातील ओबीसींच्या राजकीय मागसलेपणाच्या परिस्थितीचा आकडा आणि आढावा देणे आवश्यक आहे. पण तेवढेही राज्य सरकारच्या वतीने देण्यात आलेले नाही.

पंकजा मुंडेंचं ट्विट काय?

ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला “धक्का” नसून “धोका” मिळाला आहे. राज्यातील ओबीसींचे राजकीय व्यासपीठ, संधी आणि भविष्य संपवण्याचा अधिकार कोणाला नाही. ओबीसी राजकीय आरक्षण नाही तर निवडणूक नाही, अशा प्रकारचे ट्विट पंकजा मुंडे यांनी केले आहे.

OBC reservation : Thackeray – Pawar government’s OBC reservation is not just a “push”, but a “threat” !!; Pankaja Munde’s Sharasandhan

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात