वृत्तसंस्था
कीव : युक्रेनमधील झापोरिझ्झिया ओब्लास्ट प्रांतातील एनरहोदर शहरात रशियाने मोठा हल्ला केला आहे. त्या हल्ल्यात न्यूक्लिअर पॉवर प्लांटवर रशियाने बॉम्बफेक केली आहे. या हल्ल्यात अणुभट्टीत स्फोट झाला तर संपूर्ण युरोप संपेल, असा इशारा राष्ट्रपती झेलन्स्की यांनी रशियाला दिला आहे. Think of Europe as destroyed if a bomb blasts a nuclear power plant: Ukraine’s President’s stern warning
रशिया-युक्रेन युद्धाचा आज नववा दिवस आहे. दोन्ही देशांमध्ये सतत युद्ध सुरू आहे. रशिया युक्रेनच्या झापोरिझिया न्यूक्लियर पॉवर प्लांटवर बॉम्बफेक करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्या मुळे हा धोक्याचा इशारा राष्ट्रपती झेलन्स्की यांनी दिला आहे.
युक्रेनियन अधिकार्यांचा दावा आहे की न्यूक्लिअर पॉवर प्लांटवर झालेल्या बॉम्ब हल्ल्यानंतर या युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा केंद्रापासून धूराचे लोट उठताना दिसत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App