Sharad Pawar : उत्तर प्रदेशातील जनतेला बदल हवा आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. राज्यातील निवडणुकांनंतर नक्कीच बदल पाहायला मिळेल, असे ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर प्रदेशात निवडणूक लढवणार असल्याचे शरद पवार म्हणाले. “आम्ही समाजवादी पक्ष आणि इतर लहान पक्षांसोबत युती करून निवडणूक लढवू. उत्तर प्रदेशातील लोकांना बदल हवा आहे. राज्यात नक्कीच बदल पाहायला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. NCP to contest elections in three out of five states, Sharad Pawar predicts – Many From BJP will resign in UP in coming days
प्रतिनिधी
मुंबई : उत्तर प्रदेशातील जनतेला बदल हवा आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. राज्यातील निवडणुकांनंतर नक्कीच बदल पाहायला मिळेल, असे ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर प्रदेशात निवडणूक लढवणार असल्याचे शरद पवार म्हणाले. “आम्ही समाजवादी पक्ष आणि इतर लहान पक्षांसोबत युती करून निवडणूक लढवू. उत्तर प्रदेशातील लोकांना बदल हवा आहे. राज्यात नक्कीच बदल पाहायला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुंबईत पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी मंगळवारी सांगितले की, त्यांचा पक्ष तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीत सहभागी होणार आहे. मणिपूर, गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. मणिपूरमध्ये सध्या विद्यमान आमदार असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी पाच ठिकाणी एकत्र लढणार आहेत. गोव्यात काँग्रेस, टीएमसी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या दोन दिवसांत यावरही काही निर्णय घेतला जाणार आहे. यूपीमध्ये छोट्या पक्षांसोबत युती करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले.
यूपीतील राजकीय परिस्थितीवर बोलताना ते म्हणाले की, आज योगी मंत्रिमंडळातील मौर्य यांनी मंत्रिपदाचा आणि पक्षाचा राजीनामा दिला. आणि ते थेट अखिलेश यादव यांना जाऊन भेटले. त्यांच्यासोबत १३ आमदार राजीनामा देतील. आणि पुढच्या काही दिवसांत दररोज एखादा नवीन चेहरा परिवर्तनासाठी भाजप सोडून आमच्या सामील होत राहील.
दरम्यान, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाला (भाजप) जोरदार झटका बसला आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांच्या राजीनाम्यानंतर आणखी तीन आमदारांनी पक्ष सोडला आहे. कानपूर देहात आणि बांदा येथील आमदारांनीही भाजपचा राजीनामा दिला आहे. भाजप सोडल्यानंतर रोशनलाल वर्मा म्हणाले की, स्वामी प्रसाद मौर्य जिथे जातील तिथे त्यांच्यासोबतच राहू. भाजप सरकारवर आरोप करत ते म्हणाले, भाजप सरकारमध्ये आमची उपेक्षा झाली आहे.
गोव्यातही १४ फेब्रुवारीला मतदान होणार असून इतर राज्यांसह १० मार्चला मतमोजणी होणार आहे. गोव्यात सध्या भाजपचे सरकार आहे. मात्र अलीकडच्या काळात तृणमूल काँग्रेससोबत आम आदमी पक्षानेही तेथे निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. गोव्यात विधानसभेच्या 40 जागा आहेत. शरद पवार म्हणाले की, जागांबाबत त्यांच्या इतर पक्षांशी वाटाघाटी सुरू आहेत.
NCP to contest elections in three out of five states, Sharad Pawar predicts – Many From BJP will resign in UP in coming days
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App