सहा कोटींच्या अमली पदार्थांसह पाच जण अटकेत, ‘एनसीबी’ची मुंबईसह ठाण्यात कारवाई


विशेष प्रतिनिधी

मुंबई – मुंबईसह ठाणे आणि पुण्यात अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच कारवाई केली. या वेळी पाच तस्करांना अटक करण्यात आली. या कारवाईत दोन किलो मेफेड्रीन, तीन किलो ९०० ग्रॅम वजनाचे इपेड्राईन आणि ४५ ग्रॅम वजनाचे चरस साठा जप्त केला. आंतरराष्ट्रीय बाजारात या अमली पदार्थाची किंमत सहा कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले.NCB arrest 5 people for dug transport

अमली पदार्थ तस्करीविरुद्ध ‘एनसीबी’ने काही महिन्यांपासून धडक मोहीम हाती घेतली होती. त्याअंतर्गत आजवर ‘एनसीबी’ने काही अमली पदार्थ तस्करांना अटक केली. त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त केला होता.मुंब्रा परिसरात काही जण अमली पदार्थ तस्करी करीत असल्याची माहिती मिळाली होती. क्षेत्रीय संचालकांच्या पथकाने ही कारवाई केली होती.


 


 

या वेळी मुंब्रा येथे राहणाऱ्या साहिल हमीद मुला अजीला याला अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीतून इब्राहिम इस्माइल जहाँगीरचे नाव उघड झाले. त्यानंतर त्याला या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. इब्राहिमनंतर त्याचा अत्यंत जवळचा सहकारी इरफान परमारला ताब्यात घेतले.

त्याच्याकडून ३०० ग्रॅम वजनाचे मेफेड्रीन जप्त करण्यात आले.तपासात इरफान हा गुजरातच्या काही अमली पदार्थ तस्करांना मेफेड्रीनसह इतर अमली पदार्थ पुरवीत असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या चौकशीतून पुण्यात वास्तव्यास असलेल्या काही तस्करांची नावे उजेडात आली होती.

NCB arrest 5 people for dug transport

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात