राज कुंद्रा केसमध्ये नवीन माहिती आली समोर, ११९ फिल्म्स पॉर्न फिल्मचे केले शूटिंग, ८.८४ कोटी रुपयांना विकणार होता या फिल्म्स!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा आणि बिझनेसमन राज कुंद्रा याला पॉर्न फिल्म बनवण्याच्या आरोपावरून मुंबई पोलिसांनी अटक केली होती. आता नवीन आलेल्या माहितीनुसार राज कुंद्राने एकूण ११९ पॉर्न फिल्म्स बनवल्या होत्या. आणि या सर्व फिल्म्स तो ८.८४  करोड रुपयांना विकणार होता. सप्लिमेंटरी चार्जशीटमध्ये या सर्व गोष्टींचा खुलासा झाला आहे.

Actress shilpa shetty’s husband raj kundra’s case has got new information about 119 new porn films

कमीत कमी वेळात जास्तीत जास्त पैसा डिजिटल मिडीयममधून कमावण्याच्या उद्देशाने त्याने पॉर्न इंडस्ट्रीजमध्ये बिझनेस करण्याचे ठरवले होते. दोन वर्षांमध्ये आपले युजर्स तिप्पट करण्याच्या हेतूने आणि नफा आठ पटीने वाढविण्यासाठी त्याने इतक्या जास्त पॉर्न फिल्म्स बनवल्या होत्या. एक अँप बंद पडल्यानंतर त्याने यासाठी दुसरे अँप देखील बनवून घेतले होते. फेब्रुवारी महिन्यामध्ये मड आयर्लंडमध्ये पोलिसांनी छापा टाकला होता. तेव्हा हे पॉर्न रॅकेट उघडकीस आले होते. यामध्ये काही अभिनेत्रीचे नाव देखील पुढे आले होते. याची सखोल चौकशी केल्यानंतर पोलिस राज कुंद्रापर्यंत पोहोचू शकले. ‘विहान एन्टरप्रायजेस’ या कंपनीमार्फत हा सर्व कारभार चालायचा आणि याचे सर्व काम उमेश कामत हा व्यक्ती पाहायचा.


Raj Kundra Porn Films case : वेडं बनून पेढा खाणं यालाच म्हणतात; शिल्पा शेट्टीला शर्लिनने सुनावलं


बनवलेले सर्व पॉर्न व्हिडिओ उमेश राजच्या रेलेटिव्हीला म्हणजे प्रदीप बक्षी सोबत शेअर करायचा. त्यानंतर प्रदीप हे सर्व व्हिडीओ अँपमध्ये अपलोड करायचा. ही सर्व कामे राजच्या ऑफिसमधूनच व्हायची. हॉटशॉट या अँपवर हे अश्लिल व्हिडीओ अपलोड केले जायचे. गूगल प्ले आणि अँपल स्टोअरने ह्या अँपमध्ये  अश्लील व्हिडिओ असल्याकारणाने हे अँप बॅन केले होते. त्यानंतर राज कुंद्राने ‘बोली फेम’ नावाचे दुसरे अँप बनवले होते. हॉटशॉट या अँपवरील सर्व डेटा डिलीट केला होता. त्याचप्रमाणे त्या अँप संदर्भात व्हॉट्सअँपवरील आपले सारे मेसेजेसही त्याने डिलीट केले होते. त्याच प्रमाणे आपल्या आयटी डिपार्टमेंटलाही या संदर्भातील सर्व डेटा डिलीट करण्याचा आदेश दिला होता.

इतकं मोठं प्रकरण झालेलं असतानाही राज कुंद्रा मात्र स्वत:ला अजूनही आरोपी मानत नाही. पोलिसांना मिळाल्या पुराव्यांपैकी राज कुंद्राच्या ऑफिसमधून चोवीस हार्ड डिस्क पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्यामध्ये एकूण पस्तीस पॉर्न फिल्म्स आहेत. त्याच्या कम्प्युटरमध्ये देखील अश्लिल कंटेंट पोलिसांना आढळून आला आहे. राज कुंद्रा स्वत:ला आरोपी समजत नसला तरी सुद्धा पोलिसांनी त्याच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनाच सबळ पुरावा म्हणून कोर्टामध्ये सादर केले आहे.

Actress shilpa shetty’s husband raj kundra’s case has got new information about 119 new porn films

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण