Punjab New CM : चरणजीत सिंग चन्नी यांचा उद्या 11 वाजता शपथविधी, रंधावा आणि मोहिंद्रा दोन उपमुख्यमंत्री, काँग्रेसने नेमके काय साधले? वाचा सविस्तर…

Punjab New CM Charanjit Singh Channi Oath Taking Ceremony Monday 11 AM Randhava And Brahma Mohindra Will Be Deputy CM

Punjab New CM Charanjit Singh Channi : कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्याच्या 24 तासांनंतर अखेर पंजाबच्या नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित झाले. काँग्रेसचे दलित नेते चरणजीत सिंह चन्नी हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील. पक्षाचे प्रभारी हरीश रावत यांनी ट्विट करून कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून चन्नी यांच्या निवडीची माहिती दिली. चन्नी रामदासिया शीख समुदायाचे आहेत. तर याचदरम्यान सुखजींदर रंधावा आणि ब्रह्म मोहिंद्रा या दोघांना उपमुख्यमंत्री करणार असल्याच्या बातम्या अनेक माध्यमांत झळकल्या आहेत. Punjab New CM Charanjit Singh Channi Oath Taking Ceremony Monday 11 AM Randhava And Brahma Mohindra Will Be Deputy CM


विशेष प्रतिनिधी

चंदिगड : कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्याच्या 24 तासांनंतर अखेर पंजाबच्या नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित झाले. काँग्रेसचे दलित नेते चरणजीत सिंह चन्नी हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील. पक्षाचे प्रभारी हरीश रावत यांनी ट्विट करून कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून चन्नी यांच्या निवडीची माहिती दिली. चन्नी रामदासिया शीख समुदायाचे आहेत. तर याचदरम्यान सुखजींदर रंधावा आणि ब्रह्म मोहिंद्रा या दोघांना उपमुख्यमंत्री करणार असल्याच्या बातम्या अनेक माध्यमांत झळकल्या आहेत.

https://twitter.com/ANI/status/1439589632325263361?s=20

चन्नी यांची कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत त्यांना राज्यपालांची भेट घेण्यासाठी घेऊन गेले. नवज्योतसिंग सिद्धू आणि सुखजींदर सिंग रंधावाही त्यांच्यासोबत होते. या बैठकीनंतर चरणजित चन्नी म्हणाले की, सोमवारी सकाळी 11 वाजता शपथविधी होणार आहे. तथापि, उद्या सकाळी केवळ चन्नी यांचाच शपथविधी होईल असे सांगितले जात आहे.

चरणजीत सिंह चन्नी सलग तीन वेळा चमकौर साहिबमधून आमदार झाले आहेत. 2007 मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक जिंकली. यानंतर ते दोन वेळा काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले. ते 2015 ते 2016 पर्यंत पंजाब विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. 2017 मध्ये त्यांना कॅप्टन अमरिंदर सिंग सरकारमध्ये तंत्रशिक्षण आणि औद्योगिक प्रशिक्षण मंत्री करण्यात आले. अमरिंदर सिंग यांच्या विरोधात ऑगस्टमधील बंडाचे नेतृत्व करणाऱ्यांमध्ये चन्नी होते. पंजाबचे प्रश्न सोडवण्यासाठी अमरिंदर यांच्यावर आमचा विश्वास नाही, असेही ते म्हणाले होते.

रंधावा यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या नावावर सिद्धू असहमत

विविध माध्यमांतील वृत्तानुसार, यापूर्वी मुख्यमंत्रिपदासाठी सुखजिंदर सिंह रंधावा यांच्या नावावर सहमती झाली होती, परंतु नवज्योत सिद्धू त्यांच्या नावावर सहमत नव्हते. सिद्धू यांनी स्वत:ला मुख्यमंत्री बनवण्याचा दावा केला होता, पण ते पंजाब काँग्रेसचे प्रमुख आहेत, त्यामुळे हायकमांडने त्यांच्या नावाला मान्यता दिली नाही. यानंतर सिद्धू कॅम्पमध्ये दलित मुख्यमंत्री बनवण्याबाबत चर्चा झाली. सिद्धूंनी चन्नी यांच्या नावाला पाठिंबा देण्यामागे एक विशेष कारण आहे. वास्तविक, सिद्धू यांना एक असा मुख्यमंत्री हवा आहे, जो त्यांचे म्हणणे ऐकेल, पण सुखजींदर रंधावांचा स्वभाव तसा नाही. यामुळेच आता या नव्या चन्नी सरकारचा रिमोट हा सिद्धूंच्याच हातात असणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

काँग्रेसने चन्नी यांना मुख्यमंत्रिपदी नेमून काय साधले?

पंजाबमध्ये 32% दलित मतदार आहेत. यामध्ये शीख आणि हिंदू समाजातील दलितांचा समावेश आहे. पंजाबमध्ये जाट शीख समाज केवळ 19% आहे, परंतु आतापर्यंत त्यांनी पंजाबवर राज्य केले आहे. यामुळेच राजकीय पक्षांनी हा मुद्दा बनवायला सुरुवात केली. दलितांना उच्च पदावर बसण्यास सांगून जातीय ध्रुवीकरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामुळेच काँग्रेसने दलित व्यक्तीला मुख्यमंत्रिपदी बसवून मोठा संदेश दिला आहे.

एकीकडे, अकाली दलाने निवडणूक जिंकल्यास दलित उपमुख्यमंत्री करण्याचे आश्वासन दिले होते. अकाली दलापासून विभक्त झाल्यानंतर भाजपने म्हटले होते की, जर आम्ही निवडणुका जिंकल्या तर आम्ही दलित व्यक्तीला मुख्यमंत्री करू. आम आदमी पक्षाने अनेकदा असे म्हटले आहे की, त्यांनी दलितांच्या सन्मानासाठी पंजाब विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून हरपाल चीमा यांची नियुक्ती केली आहे. चन्नी यांना मुख्यमंत्री बनवल्यानंतर, आता काँग्रेसने दलितांना आकर्षित करण्यासाठी या सर्व समस्यांवर तोडगा काढल्याचे बोलले जात आहे.

दोन उपमुख्यमंत्री का?

पंजाबमध्ये दोन उपमुख्यमंत्री करण्याच्या सूत्रामागे खरे कारण म्हणजे, जर एखाद्या हिंदू चेहऱ्याला मुख्यमंत्री केले तर जाट शीख आणि दलित यांना उपमुख्यमंत्री बनवता येईल. जर एखाद्या शिखाला मुख्यमंत्री केले, तर हिंदू आणि दलित नेत्याला उपमुख्यमंत्री बनवता येईल. या सूत्राद्वारे काँग्रेस विरोधकांना आणि विशेषतः अकाली दलाच्या हिंदू आणि दलितांना उपमुख्यमंत्री बनवण्याच्या निवडणूक आश्वासनाला छेद देऊ शकते.

पंजाबमध्ये मुख्यमंत्री निवडण्यासाठी एवढा उशीर का?

कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर पंजाबच्या नवीन मुख्यमंत्र्याबाबतचा निर्णय शनिवारी रात्रीच विधिमंडळ गटाच्या बैठकीत घेतला जाणार होता आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड हे मुख्यमंत्री होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले होते. दरम्यान, अचानक पंजाब शीख राज्य असल्याने शीख चेहऱ्याची मागणी सुरू झाली आणि काँग्रेस हिंदू निवडावा की शिखाची निवड करावी, या द्विधा स्थितीत अडकली होती. तथापि, आता दलित शिखाची निवड करून काँग्रेसने अनेक समस्यांवर तोडगा काढल्याचे राजकीय विश्लेषक मानतात. पण प्रत्यक्षात नवे मुख्यमंत्री म्हणून चरणजीत सिंग चन्नी हे किती प्रभावी सिद्ध होतात, यावरच पुढील निवडणुकांचे भवितव्य अवलंबून आहे.

Punjab New CM Charanjit Singh Channi Oath Taking Ceremony Monday 11 AM Randhava And Brahma Mohindra Will Be Deputy CM

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात