चन्नी पंजाबचे मुख्यमंत्री बनण्याची कहाणी : पक्षश्रेष्ठींना रंधावाच हवे होते, पण सिद्धूंचा विरोध होता, 32 टक्के दलित मते साधण्यासाठी काँग्रेसची खेळी

How Channi Become Punjab CM Know Inside Story And Sidhus MasterStroke Behind It

How Channi Become Punjab CM : पंजाबचे पुढील मुख्यमंत्री म्हणून चरणजित सिंग चन्नी यांच्यावर नावावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत यांनी ट्विटरच्या माध्यमातून याची घोषणा केली आहे, परंतु हे नाव घोषित होण्याच्या सुमारे 2 तास आधीपर्यंत सुखजींदर सिंह रंधावा यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित मानले जात होते. मग असे काय झाले की काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी चरणजित यांचे नाव अंतिम केले. चन्नी मुख्यमंत्रिपदापर्यंत कसे गेले यामागची ही कथा…How Channi Become Punjab CM Know Inside Story And Sidhus MasterStroke Behind It


विशेष प्रतिनिधी

चंदिगड : पंजाबचे पुढील मुख्यमंत्री म्हणून चरणजित सिंग चन्नी यांच्यावर नावावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत यांनी ट्विटरच्या माध्यमातून याची घोषणा केली आहे, परंतु हे नाव घोषित होण्याच्या सुमारे 2 तास आधीपर्यंत सुखजींदर सिंह रंधावा यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित मानले जात होते. मग असे काय झाले की काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी चरणजित यांचे नाव अंतिम केले. चन्नी मुख्यमंत्रिपदापर्यंत कसे गेले यामागची ही कथा…

सिद्धू गटाची रंधावांवर नाराजी

काँग्रेसच्या बहुतांश आमदारांनी सुखजिंदरसिंग रंधावा यांच्या नावावर सहमती दर्शवली, पण सिद्धू गटाचा विरोध होता. याचे कारण म्हणजे सिद्धू यांनी स्वतः मुख्यमंत्री होण्याचा दावा केला होता, पण पंजाब काँग्रेस अध्यक्ष असल्याने हायकमांडला हा दावा योग्य वाटला नाही. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, रंधावा हे ऐकणाऱ्यांतले नव्हते, यामुळे सिद्धूंचे फार काही चालले नसते. याउलट चन्नी हे सिद्धूंचे विश्वासातले आणि ऐकणाऱ्यांतले आहेत. यामुळे चन्नींचा केवळ चेहरा पुढे करून प्रत्यक्षात सत्ता सिद्धूंच्याच हाती राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

बैठकीदरम्यान सिद्धू चिडून हॉटेलबाहेर गेले

सिद्धू यांचे नाव नाकारल्यानंतर त्यांनी दलित चेहऱ्याची मागणी केली. निरीक्षक अजय माकन, हरीश चौधरी आणि पंजाब काँग्रेस प्रभारी हरीश रावत कॉंग्रेस हायकमांडशी चंदिगडच्या हॉटेलमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत होते. काँग्रेसचे अनेक आमदारही येथे पोहोचले होते. बैठकीत जेव्हा हायकमांडने सुखजिंदर रंधावाच्या नावावर सहमती दर्शवली, त्यावेळी नवज्योत सिद्धू रागाने चंदिगड हॉटेलच्या बाहेर गेले होते.

रंधावा सिद्धूंचे ऐकत नाहीत म्हणूनच चन्नींचे नाव पुढे

सुखजिंदरसिंग रंधावांप्रमाणे, चरणजितही कॅप्टनविरोधात उघडपणे बंड करणाऱ्यांमध्ये होते, परंतु रंधवाऐवजी त्यांना सिद्धूमुळेच प्राधान्य मिळाले. सूत्रांचे म्हणणे आहे की, सिद्धू यांना असे मुख्यमंत्री हवे आहेत जे त्यांचे ऐकतील. दुसरीकडे, सुखजिंदर रंधावांचा स्वभाव असा नाही, ते कुणाच्या सांगण्यावरून आपले निर्णय घेत नाहीत.

32% दलित मतदारांना साधण्याचीही काँग्रेसची खेळी

चन्नी यांना मुख्यमंत्रिपदी बसवून काँग्रेसने पंजाबमध्ये 32% दलित व्होट बँक साधण्याची धडपड केली आहे. अकाली दलाने आश्वासन दिले होते की, निवडणूक जिंकल्यास ते दलित उपमुख्यमंत्री करतील. भाजपनेही दलित मुख्यमंत्री करण्याचे आश्वासनही दिले होते. आम आदमी पक्ष असा दावा करत होता की, त्यांनी दलित नेते हरपाल चीमा यांना पंजाब विधानसभेत विरोधी पक्षनेते बनवले आहे. कॉंग्रेसने ही सर्व आव्हाने लक्षात घेऊन सर्व पक्षांना राजकीय धक्का दिला आहे.

How Channi Become Punjab CM Know Inside Story And Sidhus MasterStroke Behind It

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात