नवाब मलिकांचे ‘डी’ गॅंगसोबत संबंध; पीएमएलए कोर्टाचे महत्त्वाचे निरीक्षण!!


प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि ठाकरे – पवार सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांना मनी लॉंड्रिंग प्रकरणात मोठा झटका बसला आहे. विशेष न्यायालयाने नवाब मलिकांविरुद्धच्या खटल्याची सुनावणी करताना ईडीने सादर केलेल्या आरोपपत्राची दखल घेतली. नवाब मलिक यांचे डी गॅंगशी संबंध होते. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर आणि टीचर ड्रायव्हर सलीम पटेल यांच्याबरोबर नवाब मलिक यांच्या अनेक बैठका झाल्या होत्या, असे न्यायालयाने म्हटले आहे. Nawab Malik’s connection with ‘D’ gang



गोवावाला कंपाऊंडची सुमारे 3 एकर जमीन मिळवण्यासाठी नवाब मलिकांनी हसीना पारकर आणि सलीम पटेल यांच्याबरोबर एकत्र येऊन कट रचल्याचा आरोप ईडीने केला होता. त्यालाच एक प्रकारे कोर्टाने पुष्टी दिल्याचे मानले जात आहे.

नवाब मलिकांचे ‘डी’ गॅंगसोबत संबंध

21 एप्रिल रोजी ईडीने मलिक यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. कुर्ल्यातील गोवाला कंपाऊंड ताब्यात घेण्यासाठी नवाब मलिक आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर आणि त्याचा अंगरक्षक सलीम पटेल यांच्यासोबत मंत्री नवाब मलिक यांच्या वारंवार बैठका झाल्या, मनी लॉंड्रिंग प्रकरणात त्यांचा सहभाग आहे, असे प्राथमिक निरीक्षण रोकडे यांच्या खंडपीठाने नोंदवले आहे. मलिकांते डी गॅंगशी संबध असल्याचे निरीक्षण नोंदवले गेल्याने आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Nawab Malik’s connection with ‘D’ gang

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात