काँग्रेसला नवसंजीवनी : उदयपूरच्या चिंतन शिबिरातून राहुल गांधी जोधपुरी सुटात केंब्रिज विद्यापीठात!!


काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचे शिबिर राजस्थानच्या उदयपूर मधील ताज आरवली मध्ये संपन्न झाल्यानंतर काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी जोधपुरी सुटा बुटात लंडनच्या केंब्रिज विद्यापीठात पोहोचले आहेत!! काही वर्षांपूर्वी याच राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना याच जोधपुरी सुटावरून “सूट बुट की सरकार” असे हिणवले होते. Rahul Gandhi leaves Jodhpuri from Chintan Shibir in Udaipur to Cambridge University

– पहिल्यांदाच जोधपुरी सुटात

अर्थात राहुल गांधींची केंब्रिज वारी हा काँग्रेसला नवसंजीवनी देण्याच्या उदयपूर जाहीरनाम्याचा हा पुढचा पडाव आहे. राहुल गांधी प्रथमच आपल्या सार्वजनिक जीवनात जोधपुरी सुटात दिसले आहेत. हाच तो जोधपुरी सुट आहे, जो त्यांचे पिताश्री राजीव गांधी यांनी भारताच्या तरुणाईमध्ये त्यांच्या काळात पॉप्युलर केला होता. आज मोदी जॅकेट जसे पॉप्युलर आहे, तसा त्यावेळी राजीव गांधींचा जोधपुरी सुट तरुणाईमध्ये पॉप्युलर झाला होता. त्याच्याआधी जोधपुरी सुट कोणी वापरत नव्हते, असे नाही. पण ते फार अघळपघळ आणि ढगळ असत.

– राजीव गांधींची देन

पण हा जोधपूरी सुट राजीव गांधींनी आपल्या स्मार्ट आणि आकर्षक व्यक्तिमत्वाला शोभेलसा स्लिम ट्रीम फिट डिझाईन करून घेतला होता आणि त्याचा वापर वाढवला होता. त्यामुळे तो तरुणाईमध्ये लोकप्रिय ठरला होता. राजीव गांधींनी डिझाईन करून घेतलेला “स्लिम ट्रीम फीट” जोधपुरी सुट तरुणाईमध्ये एथनिक वेडिंग वेअरच्या रूपात आजही पॉप्युलर आहे!!

– झब्बा जीन्स ते जोधपुरी सुट

अशाच जोधपुरी सूट मध्ये राहुल गांधी केंब्रिज विद्यापीठात पहिल्यांदाच दिसले आहेत. राहुल गांधींनी झब्बा आणि जीन्स पॅन्ट काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी पोशाख पाप्युलर करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यावेळी तो तितकासा पॉप्युलर होऊ शकला नाही. आता मात्र आपले पिताश्री राजीव गांधी यांच्या पावलावर पाऊल टाकत राहुल गांधींनी केंब्रिज विद्यापीठात जोधपुरी सुट घालून “राजकीय एपियरान्स” दिला आहे. अर्थात या “राजकीय एपियरान्स” परिणाम काय होतो??, हा भाग अलहिदा!! पण राहुल गांधींनी साधा झब्बा – पायजमा ते बंद गळ्याचा कोट जोधपुरी सुट हा जो मेकओव्हर केला आहे, तो मात्र निश्चित आकर्षक वाटणार आहे!!

राहुल गांधींचे व्यक्तिमत्त्व या निमित्ताने राजीव गांधी यांच्या जवळ जाणारे तरुणाईला वाटू शकते. त्यातून काही आकर्षण निर्माण होऊ शकते, असा विचार राहुल गांधी आणि त्यांच्या राजकीय ड्रेस डिझायनरने केला असल्यास त्यात नवल नाही!!

– केंब्रिजमध्ये फायर, काँग्रेसमध्ये गळती

राहुल गांधींनी अर्थातच केंब्रिज विद्यापीठात “आयडियाज ऑफ इंडिया” चर्चासत्रात सहभाग नोंदवला यामध्ये कम्युनिस्ट नेते आणि काँग्रेसचे नेते आणि अन्य काँग्रेसचे नेते सहभागी झाले आहेत. तेथे भाजप वर मोठी आगपाखड सुरु असणे अगदी स्वाभाविक आहे. या चर्चासत्राचा निष्कर्ष काय असणार??, हे देखील उघड आहे. पण राहुल गांधींनी उदयपूरच्या चिंतन शिबिरातून निघून थेट जोधपुरी सुटाबुटात थेट लंडन गाठले. ते केंब्रीज विद्यापीठात गेले, याला राजकीयदृष्ट्या फार महत्त्व आहे… बाकी भारतात काँग्रेस पक्षातून हार्दिक पटेल, सुनील जाखड, कुलदीप बिश्नोई यांची काय गळती व्हायची होवो… त्याने काँग्रेसला काय फरक पडतो??

Rahul Gandhi leaves Jodhpuri from Chintan Shibir in Udaipur to Cambridge University

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात