महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र उत्सव घटस्थापनेने सुरू झाला आहे.
विशेष प्रतिनिधी
तुळजापूर : तुळजापूर मंदिरात परंपरेनुसार धार्मिक विधी पार पडले . दरम्यान, नवरात्रोत्सवापूर्वीच गेल्या दोन दिवसांपासून शहरात मोठी गर्दी होत असून आजही ती कायम होती. तुळजाभवानी मातेची शेजघरातील निद्रिस्त मूर्ती गुरुवारी (ता. ७) सिंहासनावर अधिष्ठित केल्यानंतर अभिषेक करण्यातआला. दुपारी बाराला घटस्थापना झाली आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नवरात्र उत्सवात तुळजाभवानी देवीच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. देवीच्या महाद्वारावर ‘आई साहेब’ असे आकर्षक रोषणाईने लिहले आहे. Navratri 2021: Ude G Ambe Ude ऽऽऽ! Tuljapur decorated temple opened; See the dazzling sight
करोनाच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रउत्सवात पहाटे चार ते रात्री दहावाजेपर्यत प्रत्येक दिवशी पंधरा हजार भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे.
18 ते 20 ऑक्टोबर या तीन दिवसांच्या कालावधी जिल्हाबंदी असणार आहे. शारदीय नवराञउत्सव काळातील सर्व विधी कुलाचार हे मंहत त्या-त्या विधीचे मानकरी पुजारी यांच्या उपस्थितीत पार पाडले जाणार आहेत. विधी पार पाडताना करोना नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे, असे आदेश शारदीय नवरात्र उत्सवबाबत जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहेत. तुळजाभवानी व तुळजापूर मंदीर हे रोषणाईने नटले असून ही आकर्षक रोषणाई कॅमेरात कैद करण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी होत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App