विशेष प्रतिनिधी
उस्मानाबाद : यावर्षीही तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे साधेपणाने धार्मिक विधी करून उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.Navratra of Goddess Tulja Bhavani simply; This year the decision of the temple committee due to the corona crisis
महाराष्ट्राची कुलस्वामिनी व साडेतीन शक्तीपीठपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या आई तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव २९ सप्टेंबरपासून मंचकी निद्रेने सुरू होणार आहे. या वर्षीही मंदिर भक्तांना दर्शनासाठी बंद आहे. त्यामुळे भक्ताविना हा सण साजरा करण्यात येणार आहे.
मंचकी निद्रेनंतर ७ ऑक्टोबरला तुळजाभवानी देवीची मुर्ती सिंहासनावर प्रतिष्ठपित केली जाईल. नंतर घटस्थापना करण्यात येणार आहे, हा उत्सव २१ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. मंदिरात प्रवेश मिळणार नसल्याने भविक तसेच व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त कार्यक्रम
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App