तुळजाभवानी देवीच्या प्राचीन खजिन्यावर डल्ला; धार्मिक व्यवस्थापकाला वर्षभरानंतर अटक


प्रतिनिधी

उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या प्राचीन खजिन्यावर डल्ला मारणारा तत्कालीन व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी याला तुळजापूर पोलिसांनी अटक केली. नाईकवाडी तब्बल एक वर्ष फरार होता. Ancient treasures of Goddess Tulja Bhavani Theft ; Religious manager arrested after a year

पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर कल्याणराव गंगणे यांनी वकील शिरीष कुलकर्णी मार्फत तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडे ९ मे २०१९ रोजी लेखी तक्रार केली होती, त्यानंतर मुधोळ मुंडे यांनी चौकशी समिती नेमली होती.

तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या धार्मिक व्यवस्थापकपदी दिलीप नाईकवाडी कार्यरत असताना २९ नोव्हेंबर २००१ ते ३० नोव्हेंबर २०१८ या कालावधीत त्याने दागिन्यांवर डल्ला मारला होता. पदाचा दुरुपयोग करून मंदिर संस्थान व भाविकांची फसवणूक केली. त्याचा ताब्यात श्री तुळजाभवानी देवीचा खजिना व जामदार खान्यातील अतिप्राचिन अलंकार, वस्तू तसेच भाविकांनी अर्पण केलेले सुमारे ३४८.६६१ ग्रॅम सोने व सुमारे ७१६९८.२७४ ग्रॅम चांदीच्या वस्तू तसेच ७१ प्राचीन नाणी यावर त्याने डल्ला मारला.

१३ सप्टेंबर २०२० रोजी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रशासकीय अधिकारी तथा तहसीलदार योगिता कोल्हे यांनी फिर्याद दिली. दिलीप नाईकवाडी विरोधात फसवणूक गुन्हा दाखल केला होता. तुळजाभवानी देवीला अनेक राजे राजवाडे यांनी अर्पण केलेले बहुतांश मौल्यवान व प्राचीन दागिने तिजोरीतून गायब केले. अपर जिल्हाधिकारी यांच्या ३ सदस्यीय चौकशी समितीत ही बाब उघड झाली.

नाईकवाडीवर ठपका ठेवत सोने चांदीच्या दागिन्यात काळाबाजार झाल्याचे शिक्का मोर्तब केले होते. तुळजाभवानी मातेला निझाम, औरंगजेब, पोर्तगीज यांच्यासह बिकानेर उदयपूर लखनो बडोदा आणि इंदोर या घराण्यांतील राजे महाराजे यांनी त्यांच्या चलनातील पुरातन नाणी देवी चरणी अर्पण केली होती. या नाण्यांची नोंद तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या रेकॉर्डमध्ये १९८० पर्यंत होती. मात्र २००५ व २०१८ मध्ये करण्यात आलेल्या पंचनाम्यात या पुरातन ७१ नाण्यांसह प्राचीन सोन्या चांदीच्या वस्तू आणि मौल्यवान अलंकार दप्तरी नोंदीत नसल्याचे उघड झाले होते. गंगणे यांनी माहितीच्या अधिकारात तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या साठा नोंद दप्तराची मागणी केली होती त्यात ७१ पुरातन नाणी गायब झाल्याचे उघड झाले होते, अखेर या प्रकरणात आरोपी अटक झाल्याने अनेक बाबी उघड होतील.

Ancient treasures of Goddess Tulja Bhavani Theft ; Religious manager arrested after a year

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात