उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात ढगफुटीमुळे मुसळधार पावसाचा तडाखा , जनजीवन विस्कळीत; मदत, बचावकार्य वेगात सुरु


वृत्तसंस्था

चमोली: उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात पुन्हा ढगफुटी झाली आहे. मुसळधार पावसानंतर पांगटी गावाचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.Uttarakhand: Clouds burst in chamoli district in uttarakhand, relief and rescue operations begin

चमोली जिल्ह्यातील नारायण बगड थराली महामार्गही बंद झाला असून नाल्यातून पाण्यासोबत वाहत असलेल्या रादारोड्यामुळे दुचाकी आणि मोटारीचे नुकसान झाले आहे.



या ढगफुटीमुळे बीआरओ मजुरांच्या घरांचे नुकसान झाले. अनेक वाहने राडारोड्याच्या ढिगाऱ्याखाली दाबली गेली आहेत. हवामान विभागाने २३ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. जिल्हा प्रशासन आणि एसडीआरएफची पथके घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य राबवित आहेत.

जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये काल संध्याकाळपासून मुसळधार पाऊसपडत आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम मदत आणि बचाव कार्यावर झाला आहे. अनेक ठिकाणी वाहनांचे अपघात झाले आहेत.

Uttarakhand: Clouds burst in chamoli district in uttarakhand, relief and rescue operations begin

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात