शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत नारायण बहिरवाडे स्वगृही

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बहिरवाडे यांनी आज पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.Narayan Bahirwade Swagruhi doing ‘Jai Maharashtra’ to Shiv Sena


विशेष प्रतिनिधी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे स्वगृही परतले आहेत. नारायण बहिरवाडे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बहिरवाडे यांनी आज पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

मुंबईच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात हा प्रवेश सोहळा संपन्न झाला .उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे उपस्थित होते. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक आता चार महिन्यांवर आली आहे. याचपार्श्वभूमीवर बहिरवाडे स्वगृही परतले आहेत.

यावेळी बहिरवाडे म्हणाले की , “राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्व नेत्यांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. सर्वांनी मला स्वगृही येण्याचा आग्रह केला. विशेष म्हणजे अजितदादांनी खूप आपुलकीने माझे पक्षात स्वागत केले. त्यांचे मी आभार मानतो. मला स्वगृही परतल्याचे समाधान आहे. पक्ष जी जबाबदारी देईल ती स्वीकारणार असल्याचे बहिरवाडे यांनी सांगितले.

Narayan Bahirwade Swagruhi doing ‘Jai Maharashtra’ to Shiv Sena

महत्त्वाच्या बातम्या