आता माळेगावच्या या सभेत अजित पवार नेमक काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.The crushing season of Malegaon sugar factory starts tomorrow; The whole taluka pays attention to Ajit Pawar’s meeting
विशेष प्रतिनिधी
माळेगाव : माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा ६५ वा हंगाम शुभारंभ आणि इटीपी प्लॅन्टचे उद्घाटन समारंभ शुक्रवार ( उद्या ,दि.१५ ) सकाळी ८:३०वाजता होणार आहे.यावेळी कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत. अजित पवारांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण बारामती तालुक्याचे या सभेकडे लक्ष लागून राहिले आहे.
आत्ताच झालेल्या सोमेश्वर कारखान्याच्या सभेत अजित पवार म्हणाले होते की , आता माळेगाव कारखान्याचे यानंतर होणारे अध्यक्ष तावरे आडनाव सोडून दुसरे आडनाव असेल.
त्यानंतर संपूर्ण बारामती तालुक्यात या वक्तव्याची जोरदार चर्चा चालू होती. त्यामुळे आता माळेगावच्या या सभेत अजित पवार नेमक काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
सोमेश्वर कारखान्याचा निकाल आज जाहीर होणार आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही सभा शिवतीर्थ मंगल कार्यालय शिवनगर येथे सभा होणार आहे. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष बन्सीलाल आटोळे, संचालक मंडळ उपस्थित राहणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App