शिवसेनेकडे असलेल्या खनिकर्म महामंडळाच्या निविदा प्रक्रियेवर काँग्रेसचा आक्षेप, नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Nana Patole letter to CM uddhav thackeray Congress objection to tender process

Nana Patole letter to CM uddhav thackeray : महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेकडे असलेल्या महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाद्वारे राबवलेल्या निविदा प्रक्रियेवर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही लिहिलं आहे. महाजनको कंपनीला कोळसा पुरवणाऱ्या कोळसा वॉशिंगच्या कंत्राटाच्या निविदेवर पटोले यांनी आक्षेप घेतला आहे. संजय हरदानी यांची रुखमाई इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी गैरमार्गाने पात्र ठरल्याचा आक्षेप पटोलेंनी घेतला आहे. Nana Patole letter to CM uddhav thackeray Congress objection to tender process


विशेष प्रतिनिधी

नागपूर : महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेकडे असलेल्या महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाद्वारे राबवलेल्या निविदा प्रक्रियेवर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही लिहिलं आहे. महाजनको कंपनीला कोळसा पुरवणाऱ्या कोळसा वॉशिंगच्या कंत्राटाच्या निविदेवर पटोले यांनी आक्षेप घेतला आहे. संजय हरदानी यांची रुखमाई इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी गैरमार्गाने पात्र ठरल्याचा आक्षेप पटोलेंनी घेतला आहे.

महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळामार्फत रुखमाई इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला देण्यात येत असलेल्या कंत्राटाला स्थगिती देण्याची मागणी पटोलेंनी केली आहे. या महामंडळाच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे आमदार आशिष जयस्वाल आहेत. राज्यात महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सत्तेत आहेत. दरम्यान, नाना पटोले यांनी शिवसेनेकडील महामंडळाच्या निविदा प्रक्रियेवर आक्षेप घेतल्याने शिवसेना आणि काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

वास्तविक, नाना पटोले यांनी ऊर्जा विभागाविरोधात पत्र लिहिल्याची बातमी व्हायरल होत होती. त्यावर स्वत: पटोले यांनी स्पष्टीकरण दिलं. ऊर्जा विभागाविरोधात पत्र लिहिल्याची बातमी पूर्णपणे असत्य आणि चुकीची आहे. आपले पत्र हे खनिकर्म महामंडळातील टेंडरबाबत आहे. या महामंडळाचा ऊर्जा विभागाशी काहीही संबंध नसल्याचं नाना पटोले म्हणाले.

Nana Patole letter to CM uddhav thackeray Congress objection to tender process

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात