मुंबईतील मैदानाचे काँग्रेसकडून टिपू सुलतान नामकरण, विश्व हिंदू परिषदेचा कडाडून विरोध, मुख्यमंत्री ठाकरेंना निवेदन


मुंबईत पुन्हा एकदा टिपू सुलतान नावाने राजकारण पेटले आहे. मालाड, मुंबई येथे 26 जानेवारी रोजी टिपू सुलतान मैदानाचे उद्घाटन काँग्रेस नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते होणार आहे. याबाबत भाजपसह विश्व हिंदू परिषदेने आक्षेप घेत निषेध नोंदवला आहे.Naming of Ground Tipu Sultan in Mumbai by Congress leader, strong opposition to Vishwa Hindu Parishad, letter to CM Thackeray


प्रतिनिधी

मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा टिपू सुलतान नावाने राजकारण पेटले आहे. मालाड, मुंबई येथे 26 जानेवारी रोजी टिपू सुलतान मैदानाचे उद्घाटन काँग्रेस नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते होणार आहे. याबाबत भाजपसह विश्व हिंदू परिषदेने आक्षेप घेत निषेध नोंदवला आहे.

विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते श्रीराज नायर यांनी ट्विट केले आहे की, हा निश्चितपणे आपल्या मुंबईची शांतता बिघडवण्याचा हेतू आहे आणि हे टाळता आले असते, आपला महाराष्ट्र ही संतभूमी आहे आणि एका क्रूर रानटी हिंदूविरोधी नावाने हे नामकरण खेदजनक आहे.



विश्व हिंदू परिषदेकडून निषेध

मालाडच्या मालवणी संकुलातील क्रीडांगणाचे नाव ‘वीर टिपू सुलतान क्रीडा संकुल’ ठेवण्याचा सत्ताधारी काँग्रेसचा प्रयत्न आहे. हे काम स्थानिक कॉग्रेस नेते व मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या निधीतून पूर्ण होत आहे. त्याचा लोकार्पण कार्यक्रम बुधवार, दि. 26 जानेवारी रोजी करावयाचे आहे, असे माहिती फलक लावण्यात आले आहेत.

टिपू सुलतान हा हिंदुविरोधी होता. त्यांनी अनेक मंदिरे पाडून हजारो हिंदूंचे धर्मांतर करून घेतले. त्याने अनेक हिंदूंना मारले. अशा क्रूर सुलतानाचा गौरव करणे सहन होणार नाही. हे नामकरण तत्काळ थांबवण्यात यावे, आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करत आहोत, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषद, मुंबईचे सहमंत्री/प्रवक्ते श्रीराज नायर यांनी केले आहे.

Naming of Ground Tipu Sultan in Mumbai by Congress leader, strong opposition to Vishwa Hindu Parishad, letter to CM Thackeray

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात