आधी काढला “बाप”; नंतर झटकले हात; मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांचा “प्रताप”…!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : आधी काढला “बाप”; नंतर झटकले हात; मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांचा “प्रताप…!! होय… हा किस्सा आजच घडला आहे, त्यांच्या बाबतीत. कोरोना प्रतिबंधक लसी मिळविण्याचे कंत्राट कुणाला दिले असा प्रश्न एका नागरिकाने किशोरी पेडणेकरांना उद्देश्यून विचारला होता. त्या नागरिकाला किशोरी पेडणेकरांच्या मोबाईलवरून ट्विट करून उत्तर दिले गेले, तुझ्या बापाला…!! Mumbai mayor kishori pendenkar had to delete the twitte that insulted mumbaikars

झाले, हे उत्तर किशोरी पेडणेकरांच्या चांगलेच अंगाशी आले. ट्विटवर त्या जबरदस्त ट्रोल झाल्या. मुंबईकरांचा अपमान हा हॅशटॅग जोरात चालला. ते पाहताच आधी किशोरी पेडणेकरांनी ते ट्विट डिलीट केले. तरीही ट्रोलिंग थांबेना. मुंबईच्या महापौर किती उर्मट आहेत, त्या प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांचा बाप काढतात. ही टीका सुरू झाली.याची दखल शिवसेनेच्या अतिवरिष्ठ पातळीवरून घेण्यात आली. शेवटी किशोरी पेडणेकरांना पत्रकार परिषद घेऊन खुलासा करावा लागला. पत्रकार परिषदेत किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, “बीकेसीत मी एका कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी माझ्यासोबत शाखाप्रमुख आणि दोन कार्यकर्ते होते. प्रत्यक्ष कार्यक्रमात असताना मी मोबाईल माझ्याकडे ठेवत नाही. तसेच माझ्या मोबाईल लॉक नसतो. त्यामुळे मोबाईल पाहात असताना शिवसैनिकाने हे ट्विट केले होते”.

त्या म्हणाल्या, की “आता तर मला धडा मिळाला आहे. कोणी कितीही जवळचा असला तरी त्याच्याकडे मोबाईल देऊ नये हा धडाच यानिमित्ताने मिळाला आहे. आज त्याने ट्विट केले आहे, उद्या दुसरेही काही होऊ शकते. त्यामुळे इथून पुढे माझ्याकडे यायचे नाही, असे मी त्या शिवसैनिकाला सांगितले आहे.”

“ते ट्विट पाहिल्यानंतर ही मोठी चूक झाल्याचे माझ्या लक्षात आले. मी तात्काळ ते ट्विट डिलीट केले. आपल्याशी कोणी कितीही वाईट वागले तरी आपण तसे वागू नये या मताची मी आहे. मी कधीही गैरवर्तन करत नाही, असा दावाही त्यांनी केला.

Mumbai mayor kishori pendenkar had to delete the twitte that insulted mumbaikars

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय