जागतिक आरोग्य संघटनेच्या खुलाशाने भारताचा सुटकेच्या निश्वास, कोरोनाचा एकच स्ट्रेन चिंताजनक


विशेष प्रतिनिधी

जीनिव्हा : भारतात सर्वांत प्रथम आढळलेला कोरोनाचा प्रकार ज्याला ‘डेल्टा’ नाव दिले आहे, तोच एक चिंताजनक आहे, अन्य दोन प्रकारांचा धोका कमी आहे,’ असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. WHO clarify regarding Indian strain

सध्या मोठ्या प्रमाणावर लोकांच्या आरोग्यासाठी ‘बी. १.६१७.२’ हा विषाणूचा प्रकार जास्त धोकादायक असून अन्य प्रकारांमुळे संसर्ग पसरण्याचा वेग कमी आहे, असे कोरोनासंबंधी आरोग्य संघटनेतर्फे जाहीर होणाऱ्या साप्ताहिक निवेदनात म्हटले आहे.‘बी. १.६१७.२’ हा अद्याप चिंतेचा विषय असून अन्य तीन प्रकारही धोकादायक मानले जात आहे. या प्रकाराने संसर्ग वेगाने पसरत असल्याने तसेच प्राणघातक आणि लशींच्या सुरक्षेला भेदणारे असल्याने कोरोनाच्या मूळ विषाणूपेक्षा हे प्रकार जास्त धोकादायक आहेत.

भारतात कोरोनाची दुसरी लाट जास्त हानिकारक ठरली. यामागे ‘बी.१.६.१७’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या विषाणूचा एक प्रकार कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. हा प्रकार तीन शाखांमध्ये विभागला गेल्याने त्याला ‘ट्रिपल म्युटंट’ असे म्हटले जाते. विषाणूचा हा ‘चिंताजनक प्रकार’ असल्याचे ‘डब्ल्यूएचओ’ने गेल्या महिन्यात जाहीर केले होते. पण या तीन शाखांपैकी एकच प्रकार चिंताजनक आहे, असे आता जाहीर केले.

WHO clarify regarding Indian strain

महत्त्वाच्य बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण