इस्त्राईलने लसीकरणातून मिळवली ‘हर्ड इम्युनिटी’, बहुतांश सारे निर्बंध मागे


विशेष प्रतिनिधी

लंडन – इस्त्राईलमध्ये ६० टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण झाल्याने सामूहिक प्रतिकारशक्ती म्हणजेच हर्ड इम्युनिटी विकसित झाली आहे. आता यानुसार नागरिक रेस्टॉरंट, क्रीडांगण आणि चित्रपटगृहात, बाजारात निर्धास्तपणे जावू शकतात. यासाठी लस घेतल्याचा पुरावा दाखवण्याची गरज भासणार नाही. ९० लाख लोकसंख्येच्या इस्त्राईलमध्ये १९ डिसेंबर रोजी लसीकरण मोहीम सुरू झाली. त्यानंतर महिनाभरातच संसर्गाच्या दरात घसरण सुरु झाली. Vaccination get herd immunity in Israel

इस्त्राइलमध्ये नव्या नियमानुसार शाळा अगोदरच सुरू झाल्या आहेत. तसेच मास्क देखील वापरण्याची आवश्यसकता नसल्याचे सरकारने म्हटले आहे. इस्त्राईलमध्ये सुमारे ८० टक्के ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. या बळावर इस्त्राईलने हर्ड इम्युनिटी मिळवली आहे. दुसरीकडे ब्रिटनमध्ये देखील लसीकरणाचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत.



दहा महिन्यानंतर प्रथमच मंगळवारी कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झाला नाही. इस्त्राईलमध्ये हॅर्ड इम्युनिटी तयार झाल्याने कोरोना संसर्गाचे सरासरी १५ टक्के रुग्ण आढळून येत आहेत. एक वर्षानंतर कोरोना संसर्गाचा हा नीचांक मानला जात आहे. यादरम्यान काल इस्त्राईल सरकारने कोविडला रोखण्यासाठी लागू केलेले सर्व निर्बंध मागे घेतले.

हर्ड इम्युनिटीपर्यंत पोचण्यासाठी ७० ते ८० टक्के लोकांना लस मिळणे गरजेचे आहे. मात्र इस्त्राईलने केवल ६० टक्के लोकांना लस देऊन हर्ड इम्युनिटी मिळवली. आता त्यात ८० टक्के ज्येष्ठ नागरिक आहेत. लहान मुलांना अद्याप लस दिलेली नाही.

Vaccination get herd immunity in Israel

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात